VIDEO : 'तमाशा लाईव्ह'मधील 'रंग लागला..' गाण्यावर थिरकल्या 'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या मैत्रिणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 04:30 PM2022-07-09T16:30:20+5:302022-07-09T16:30:51+5:30

'तमाशा लाईव्ह' चित्रपटातील ‘रंग लागला, तुझा छंद लागला’ (Rang Lagala) हे गाणं सुपरहिट झालं आहे. या गाण्यावरच्या अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या गाण्याने रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिकेतील दीपाच्या मैत्रिणी म्हणजे साक्षी आणि अश्विनीलाही भुरळ पाडली आहे.

VIDEO: 'Rang Mazha Vegla' fame Manasi Ghate And Vaishali Bhosale dancing on 'Rang Lagla ..' Song from 'Tamasha Live' | VIDEO : 'तमाशा लाईव्ह'मधील 'रंग लागला..' गाण्यावर थिरकल्या 'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या मैत्रिणी

VIDEO : 'तमाशा लाईव्ह'मधील 'रंग लागला..' गाण्यावर थिरकल्या 'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या मैत्रिणी

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) चित्रपटाची सातत्याने चर्चा होताना दिसत आहे. संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित या चित्रपटातील गाण्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक चर्चा आहे ती सोनाली कुलकर्णी(Sonalee Kulkarni)वर चित्रीत झालेले ‘रंग लागला, तुझा छंद लागला’ (Rang Lagala) या गाण्याची. हे गाणं सुपरहिट झालं आहे. या गाण्यावरच्या अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या गाण्याने स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिकेतील दीपाच्या मैत्रिणी म्हणजे साक्षी आणि अश्विनीलाही भुरळ पाडली आहे. साक्षी आणि अश्विनी म्हणजेच मानसी घाटे (Manasi Ghate) आणि वैशाली भोसले (Vaishali Bhosale) या दोघींचा रंग लागला या गाण्यावरील रिल समोर आला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

अभिनेत्री मानसी घाटे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्यासोबत अभिनेत्री वैशाली भोसले रंग लागला या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते आहे. इतकेच नाही तर दिग्दर्शक संजय जाधव यांनीदेखील या व्हिडीओवर हार्ट इमोजी शेअर केली आहे. ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह सचित पाटील, हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव , भरत जाधव अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १५ जुलै रोजी रिलीज होणार आहे. 


मानसी घाटेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती रंग माझा वेगळा या मालिकेतून साक्षीच्या भूमिकेतून ती घराघरात पोहचली आहे. तिची ही पहिलीच मालिका आहे.

तर वैशाली राहुल भोसले हिच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचे तर तिने मालिका, नाटक या माध्यमात काम केले आहे. तिला रंग माझा वेगळा या मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिने याशिवाय चंद्र आहे साक्षीला, तू माझा सांगाती, लक्ष्य आणि बऱ्याच मालिकेत काम केले आहे. तसेच ती रमेश मोरे लिखित आणि दिग्दर्शित टॉपर या सीरिजमध्येही झळकली आहे.

Web Title: VIDEO: 'Rang Mazha Vegla' fame Manasi Ghate And Vaishali Bhosale dancing on 'Rang Lagla ..' Song from 'Tamasha Live'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.