Video - जबरदस्त! शाहरुखचा जबरा फॅन; 'जवान' पाहण्यासाठी व्हेंटिलेटरसह गाठलं थिएटर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 03:19 PM2023-09-16T15:19:04+5:302023-09-16T15:19:37+5:30

शाहरुख खानबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ एवढी आहे की, जवान चित्रपट पाहण्यासाठी एक चाहता थेट व्हेंटिलेटरसह थिएटरमध्ये पोहोचला.

Video shah rukh khan fan watches jawan while on ventilator | Video - जबरदस्त! शाहरुखचा जबरा फॅन; 'जवान' पाहण्यासाठी व्हेंटिलेटरसह गाठलं थिएटर

Video - जबरदस्त! शाहरुखचा जबरा फॅन; 'जवान' पाहण्यासाठी व्हेंटिलेटरसह गाठलं थिएटर

googlenewsNext

शाहरुख खान स्टारर 'जवान' हा चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. बॉक्स ऑफिसवर यश पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे चाहत्यांमध्ये या चित्रपटाची क्रेझ एका वेगळ्याच पातळीवर पोहोचली आहे. शाहरुख खानबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ एवढी आहे की, जवान चित्रपट पाहण्यासाठी एक चाहता थेट व्हेंटिलेटरसह थिएटरमध्ये पोहोचला.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुख खानचा हा फॅन चित्रपटाचा आनंद घेताना दिसत आहे.विशेष म्हणजे तो फॅन व्हेंटिलेटरवर आहे. अनीस फारुकी असं या चाहत्याचं नाव आहे. रोहित गुप्ता नावाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने व्हेंटिलेटरवर असताना चित्रपट पाहायला गेलेल्या या शाहरुख फॅनचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

अनीस गंभीर आजाराने त्रस्त आहे. पण या व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या अॅक्शन सीनदरम्यान हा चाहता खूप आनंदी असल्याचं दिसून आलं. असाच आणखी एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. यात हॉस्पिटलच्या गाऊनमध्ये एक मुलगी 'चलेया'वर नाचताना दिसत आहे. SRK HAS HEALING POWERS असं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. याव्हिडिओने शाहरुख खानचं लक्ष वेधून घेतल. 

शाहरूखने "हे छान आहे! धन्यवाद, लवकर बरे व्हा आणि चित्रपट पाहा!!! तुम्ही हॉस्पिटलमधून बाहेर आलात की आणखी एका डान्स व्हिडिओची वाट पाहत आहे, तुमच्यावर प्रेम आहे" असं म्हटलं आहे जवान चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत 400 कोटींचा टप्पा ओलांडला असून बॉक्स ऑफिसवर तो ब्लॉकबस्टर ठरला आहे.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Video shah rukh khan fan watches jawan while on ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.