VIDEO : "बहन होगी तेरी"चा ट्रेलर रिलीज, राजकुमार रावचा कॉमेडी अंदाज
By Admin | Published: May 2, 2017 03:35 PM2017-05-02T15:35:42+5:302017-05-02T15:40:37+5:30
राजकुमार राव आणि श्रुती हसन यांची फ्रेश जो़डी असलेला सिनेमा "बहन होगी तेरी"चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - साधारणतः एखाद्या मुलीची किंवा तिच्या कुटुंबीयांची पार्श्वभूमी जाणून न घेतला तिच्यासोबत पूर्णपणे प्रेम निभावण्याच्या शपथा अनेक मुले घेताना दिसतात. त्यातही एकाच मुलीवर प्रेम करणारी मुलं एकमेकांना, बहन होगी तेरी (बहिण असेल तुझी), असे सांगून त्याची आठवणही करुन देत असतात.
दररोज रोजच्या वापरात येणार हा डायलॉग आता राजकुमार राव आणि श्रुती हसन यांचा आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरवरुन कॉमेडी रोमँटिक सिनेमा असल्याचं दिसत आहे. या कथेत गट्टू म्हणजे राजकुमार राव आपल्या शेजारी राहणारी बिन्नी म्हणजे श्रुती हसनवर प्रेम करत असतो.
ट्रॅप्ड सिनेमामुळे राजकुमार रावची अभिनय क्षेत्रातील प्रतिमा पूर्णतः बदलली आहे. त्यानंतर आता एका कॉमेडी सिनेमाद्वारे राजकुमार पुन्हा सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. शिवाय, श्रुती हसन आणि राजकुमार रावची फ्रेश जोडी यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
गट्टूचे (राजकुमार) आपल्या शेजारी राहणा-या बिन्नी (श्रुती हसन)वर लहानपणापासून प्रेम असते. मात्र परिसरातच राहणा-या मुली साधारणतः बहिणी असतात असं तेथील लोकांचं म्हणणं असतं. लोकांच्या या समजामुळे गट्टू हैराण झालेला असतो. मात्र काही वेळानंतर बिन्नीदेखील गट्टूच्या प्रेमात पडते. पण तेव्हाच सिनेमाच्या कहाणीमध्ये बरीच वळणं येताना दिसतात. या सिनेमामध्ये रिअॅलिटी शो बिग बॉसचा विजेता गौतम गुलाटीदेखील दिसत आहे.
सध्याच्या ट्रेंडनुसार या सिनेमातही "जानू मेरी जान मै तेरे कुर्बान" या गाण्याचं रिमिक्स वर्जन पाहायला मिळणार आहे.
"बहन होगी तेरी" या सिनेमाचे दिग्दर्शन अजय पन्ना लाल यांनी केले आहे. हा सिनेमा 2 जून रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 2015 साली आलेल्या गब्बर इज बॅक सिनेमामध्ये श्रुतीला शेवटचे मोठ्या पडद्यावर पाहण्यात आले होते.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला "राबता" हा सिनेमामध्ये राजकुमार राव आगळ्या वेगळ्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. "राबता" सिनेमामध्ये राजकुमार राव 324 वर्षांच्या वयोवृद्धाची व्यक्तीरेखा साकारत आहे. त्याच्या लुकसाठी सिनेमाच्या निर्मात्यांनी खास करुन हॉलिवूडमधील मेकअप आर्टिस्टना बोलावलं होते.
324 वर्षांच्या वयोवृद्धाच्या व्यक्तीचा पेहराव परिधान करताना त्याला मेकअपसाठी संपूर्ण 6 तास लागायचे. राजकुमारनं केवळ दिसण्यावरच नाही तर शरीराची ठेवण व आवाजावरही प्रचंड मेहनत घेतली आहे. या अनोख्या भूमिकेबाबत राजकुमार सांगतो की, "जेव्हा शुटिंगसाठी मेकअप करण्याची वेळ यायची तेव्हा मी पूर्ण घामाने भिजायचो. त्यामुळे मेकअप करताना संयमाने बसावं लागायचे. मात्र ही भूमिका वेगळी असल्याने ती पार पाडताना खूप मज्जा आली.सिनेमामध्ये माझी भूमिका फार छोटी आहे पण वजनदार आहे. ही भूमिका निभावताना निर्माता आणि दिग्दर्शकांनी मला पूर्णतः स्वातंत्र्य दिले होते".
आपल्या अभिनयावर सिनेरसिकांवर छाप पाडणा-या राजकुमार रावचा "ट्रॅप्ड" सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या सिनेमा बॉक्सऑफिसवर विशेष छाप पाडू शकला नाही. मात्र राजकुमारच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झाले.