VIDEO : सोनाक्षी सिन्हाच्या नूर सिनेमाचा ट्रेलर रिलीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2017 03:13 PM2017-03-07T15:13:27+5:302017-03-07T15:14:42+5:30

बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा आगामी सिनेमा 'नूर' चा ट्रेलर रिलीज करण्यात आता आहे. सिनेमाचा ट्रेलर सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण करणारा आहे.

VIDEO: Sonakshi Sinha's Noor Movie Trailer Release | VIDEO : सोनाक्षी सिन्हाच्या नूर सिनेमाचा ट्रेलर रिलीज

VIDEO : सोनाक्षी सिन्हाच्या नूर सिनेमाचा ट्रेलर रिलीज

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 7 - बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा आगामी सिनेमा 'नूर' चा ट्रेलर रिलीज करण्यात आता आहे. सिनेमाचा ट्रेलर सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण करणारा आहे. 
 
सिनेमामध्ये सोनाक्षी एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये सोनाक्षी गंमतीशीर तसेच गंभीर अंदाजात दिसत आहे. सोनाक्षी शारीरिक वजन आणि करिअर लाईफमध्ये झुंजत असल्याचे पाहायला मिळत आहे.  
(विद्या बालनचा 'बेगम' अवतार, पोस्टर रिलीज)
 
दमछाक करणारी नोकरी, कामाचा ताण आणि लव्ह लाईफमधील संघर्ष, या सर्व भावना सांगणारी 'नूर'ची (सोनाक्षी सिन्हा) कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.  दैनंदिन आयुष्यातील आनंद-सुख कुठेतरी हरवलंय, कशामुळे तरी अडकलंय, हे सांगणारी 'नूर' या पत्रकार-लेखिकेची ही कहाणी.
(फक्त 'या' तिघांनाच माहीत होते करणचे ' ते' सिक्रेट)
 
सोनाक्षी सिन्हा ट्रेलरमध्ये एका झल्ली मुलीच्या अवतारात दिसत आहे. ती स्वतःचा जोकर पत्रकार म्हणून उल्लेख करत असते. सतत कुठेतरी आपट, धडपड्याची स्वभावाच्या नूरचे पात्र सोनाक्षी साकारणार आहे. ट्रेलरच्या शेवटी नूरच्या आयुष्यात एक वेगळंच वळण येतं, असेही दाखवण्यात आले आहे, याद्वारे प्रेक्षकांची सिनेमाप्रती उत्सुकता ताणून ठेवण्यात आली आहे.
 
सिनेमामध्ये पुरब कोहली, कनन गिल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या ट्रेंडनुसार या सिनेमातही 1970 साली सुपरहिट ठरलेले 'गुलाबी आँखे जो तेरी देखी...' हे गाण्याचे रीमेक करण्यात आले आहे, ज्यावर सोनाक्षी थिरकताना दिसत आहे. 
 
21 एप्रिलला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
 
 

Web Title: VIDEO: Sonakshi Sinha's Noor Movie Trailer Release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.