गोड गळ्याचे सुरेश वाडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2016 12:01 PM2016-08-07T12:01:34+5:302016-08-07T17:31:34+5:30
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गोड गळ्याचे गायक म्हणून सुरेश वाडकर यांचा नावलौकिक आहे. त्यांचा ७ आॅगस्ट रोजी वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्या काही नावाजलेल्या गाण्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गोड गळ्याचे गायक म्हणून सुरेश वाडकर यांचा नावलौकिक आहे. त्यांचा ७ आॅगस्ट रोजी वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्या काही नावाजलेल्या गाण्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत.सदमा चित्रपटातील गुलजार यांच्या ‘ए जिंदगी गले लगा ले’ हे गाणं अत्यंत सुंदर आवाजात सुरेश वाडकर यांनी म्हटले आहे. और इस दिल मेइमानदार चित्रपटात आशा भोसले, सुरेश वाडकर यांनी म्हटलेले ‘और इस दिल मे क्या रख्खा है’ हे गाणं अजूनही लोकप्रिय आहे.माचीस चित्रपटातील चप्पा चप्पा चरखा चले हे सुरेश वाडकर यांनी म्हटलेले गीत लोकांच्या ओठी आहे.डिस्को डान्सर या चित्रपटातील गोरों की ना कालों की हे गाणं लोकप्रिय ठरले.मासूम चित्रपटातील हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए हे सुरेश वाडकर यांचे रोमँटिक गाणे अजूनही लोकांना आवडते.चाँदनी चित्रपटात लगी आज सावन की हे गाणं अजूनही काही रोमँटिक गाण्यापैकी एक आहे.प्यासा सावन चित्रपटातील मेघा रे मेघा रे गाणे पावसाळ्यातील उत्तम गाण्यांंपैकी एक आहे.प्रेम रोग चित्रपटातील मुहब्बत है क्या चीज हे गाणं खूप लोकप्रिय आहे.दिल चित्रपटातील ओ प्रिया प्रिया हे गाणे सॅड साँगमधील लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे.राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील राम तेरी गंगा मैली हे गाणे खूपच गाजले.