Jeev Zala Yeda Pisa Fame (Shiva - Siddhi)Ashok Phal Dessai & Vidula Chougule पुन्हा एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 14:13 IST2021-09-08T14:12:52+5:302021-09-08T14:13:31+5:30
जीव झाला येडापीसा ही मालिका संपली तरी प्रेक्षक शिवा-सिद्धीच्या जोडीला विसरु शकलेले नाही. ही जोडी अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. या मालिकेची लोकप्रियता लक्षात घेतात ही मालिका हिंदीमध्ये सुरु बावरा दिल नावाने सुरु करण्यात आली.तिलाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. जीव झाला येडापीसा मालिका संपल्यानंतर शिवादादा म्हणजेच अभिनेता अशोक फळदेसाई मेंहदी है रचनेवाली या हिंदी मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत झळकला. त्यानंतर तो विदुलासोबत लागिर आणि आमचा गणराया या म्युझिक अल्बमध्ये दिसला. पण तरीही शिवा-सिद्धी पुन्हा एकत्र कधी झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना कायम आहे. जीव झाला येडापीसाचा दुसरा भाग येणार का?... तो यावा अशी इच्छाही चाहत्यांची आहे. यातच अशोकने एक व्हीडीओ शेअर केलाय.या व्हीडिओला त्याने क्राईम पार्टनर असं कॅप्शन दिलय..