Next

Sundara Manamadhe Bharli Upcoming Ep | लतिकाला सज्जनरावांचा ओरडा | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 18:52 IST2021-08-31T18:51:57+5:302021-08-31T18:52:16+5:30

सज्जनरावांचा हा रुद्रावतार यापूर्वी आपण मालिकेत कधीच पाहिला नव्हता. एरव्ही लतिकाला सांभाळून घेणारे, तिची साथ देणारे सज्जनराव आज मात्र तिच्यावर प्रचंड चिडलेले पहायला मिळाले. लतिकाने असं नेमक केलं तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं कारण म्हणजे अभिमन्यू... अभिमन्यूला भेटण्याच्या नादात लतिका बँकेत तब्बल एक तास उशीरा पोहचते. बँकेत आबांची माणसं वाट पहात होती. त्यामुळे सज्जनराव भडकतात आणि त्यांचा पारा चढतो. ते सगळ्यांसमोर लतिकाला ओरडतात. आणि यापुढे तुमची व्यक्तिगत काम सुट्टीच्या दिवशी करायची...आणि पुन्हा मला उशीर होतोय असा मेसेज करायता नाही असं स्पष्ट करतात.