Swapnil joshi's Kids Raghav, Mayra Video | स्वप्नीलचे बाबा आणि मुलाची अनोखी बॉण्डिंग | Lokmat Filmy
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 11:00 AM2021-09-02T11:00:42+5:302021-09-02T11:00:56+5:30
अभिनेता स्वप्नील जोशी हा मायरा आणि राघव यांचे गोड व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. राघवचा असाच एक गोड व्हीडिओ सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. लॉकडाऊनमुळे शाळा घरीच भरत असल्यानं राघला आणि आजोबांची गट्टी जमलीये. अभ्यासातून सुट्टी मिळाली की राघव आजोबांना कविता म्हणून दाखवतो तर कधी त्यांच्यासोबत खेळण्यात दंग होतो. असाच एक आजोबांसोबत खेळतानाचा राघवचा व्हीडिओ स्वप्नीलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हीडिओला पुष्पक विमान या सिनेमातील मोहन जोशींचा डायल़ॉगने चार चांद लावलेत. आजोबा म्हणजे नावाचा पहिला दोस्त असतो.नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्ताची सर नसते. आणि नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो. हा हायलॉग आपल्याला बॅकग्राऊंडला ऐकायला मिळतोय. या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.