'लायगर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पणचा विजय देवरकोंडाचा निर्णय चुकला?, पहिल्याच वीकेंडला झाली अवस्था बिकट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 12:52 PM2022-08-29T12:52:30+5:302022-08-29T13:11:28+5:30
Liger Box Office Collection: विजय देवरकोंडाचा 'Liger' वीकेंडला फ्लॉप ठरला आहे. चार दिवसांत हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्येही सामील होऊ शकलेला नाही.
Liger Box Office Collection Day 4:बॉलीवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकत नाहीत.
जे चित्रपट चांगले व्यवसाय करतील अशी अपेक्षा होती ते सर्व चित्रपट फ्लॉप ठरताना दिसतायेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपट एकामागो माग एक फ्लॉप होताना पाहिलेत..आता या यादीत विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे(Ananya Panday) यांच्या 'लायगर' या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. गेल्या आठवड्यात रिलीज झालेला Liger आधीच वीकेंडला फ्लॉप असल्याचे सिद्ध झाले आहे. चित्रपटाचे चौथ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. जे पाहून असे म्हणता येईल की हा चित्रपट थिएटरमध्ये फार काळ टिकणार नाही.
लायगरमध्ये विजय आणि अनन्यासोबत रम्या कृष्णन, रोनित रॉय महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले आहेत. माईकचा कॅमिओही चित्रपट वाचवण्यात यशस्वी ठरला नाही.
चौथ्या दिवसाचे कलेक्शन आलं समोर
रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर लायगरने चौथ्या दिवशी जवळपास 5.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. शनिवारीही या चित्रपटाने फारसा बिझनेस केलेला नाही. रिपोर्टनुसार शनिवारी सुमारे 6.95 कोटींचा व्यवसाय झाला.
नाही चालली विजयची जादू
विजय देवरकोंडाच्या या चित्रपटातून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे या चित्रपटाचे जबरदस्त प्रोमोशन ही करण्यात आलं होतं. पण आता विजय देवरकोंडाचे लायगरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय चुकाला असल्याचे मानले जात आहे.