‘निळकंठ मास्तर’मध्ये विक्रम गोखले यांचा करारी बाणा

By Admin | Published: August 7, 2015 11:17 PM2015-08-07T23:17:46+5:302015-08-07T23:17:46+5:30

कोणत्याही भूमिकेचे सोने करणारे ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांचा करारी बाणा ‘निळकंठ मास्तर’ या चित्रपटात दिसणार आहे. वयोवृद्ध क्रांतिकारकाची त्यांची भूमिका या चित्रपटाला वेगळीच

Vikram Gokhale in 'Nilkantha Master' | ‘निळकंठ मास्तर’मध्ये विक्रम गोखले यांचा करारी बाणा

‘निळकंठ मास्तर’मध्ये विक्रम गोखले यांचा करारी बाणा

googlenewsNext

कोणत्याही भूमिकेचे सोने करणारे ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांचा करारी बाणा ‘निळकंठ मास्तर’ या चित्रपटात दिसणार आहे. वयोवृद्ध क्रांतिकारकाची त्यांची भूमिका या चित्रपटाला वेगळीच उंची देणारी ठरली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ‘क्रांतिकारकां’चा खूप मोठा वाटा होता. ब्रिटिशांचे क्रांतिकारकांच्या प्रत्येक लहान-सहान घडामोंडींवर लक्ष होते... पकडले गेलो तर मरण निश्चितच, याची जाण प्रत्येक क्रांतिकारकाला होती. म्हणून क्रांतिकारकाची ही स्वातंत्र्य मोहीम भूमिगत पद्धतीने सुरू होती. यात अनेक क्रांतिकारकांना प्राणांची आहुती द्यावी लागली... मात्र या शहिदांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्याचीच कहाणी ‘निळकंठ मास्तर’ या चित्रपटात सांगितली आहे.
या चित्रपटातील वयोवृद्ध परंतु करारी बाण्याच्या क्रांतिकारकाची भूमिका विक्रम गोखले यांनी साकारली आहे. त्यांची संवादफेक आणि देहबोलीतून त्यांनी या क्रांतिकारकाला अक्षरश: जिवंत केले आहे. याबाबत विक्रम गोखले सांगतात, ‘‘स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे, या ध्येयाने तो काळ झपाटलेला होता. तरुणांसह वृद्धदेखील या लढ्यात सहभागी झाले होते. इतर क्रांतिकारकांना मोहिमेची दिशा देण्याची भूमिका यामध्ये मी रेखाटली आहे.’’
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे म्हणतात, ‘‘या भूमिकेसाठी पात्रांची निवड खूप विचार करून करण्यात आली आहे. त्यामुळे वृद्ध सशक्त क्रांतिकारकासाठी सुरुवातीपासूनच विक्रम गोखले यांचे नाव डोळ्यासमोर होते. या भूमिकेमध्ये ते अगदी चपखल बसले आहेत.’’

Web Title: Vikram Gokhale in 'Nilkantha Master'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.