प्रियकरामुळे प्रॉस्टिट्यूशनमध्ये ढकलली गेली होती सुनीत दत्त यांची हिरोईन, शेवट तर फार वाईट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 09:54 AM2023-03-18T09:54:44+5:302023-03-18T10:55:32+5:30
Actress Vimi Life story : विमीच्या जीवनात असे काही चढउतार आले की, ती अचानक गायबच झाली. विमी जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा ती आधीच विवाहित होती आणि दोन मुलांची आई होती.
अभिनेत्री विमी (Actress Vimi), फिल्म इंडस्ट्रीतील असं नाव आहे जिचा बॉलिवूडमधील प्रवास फार कमी काळाचा होता. पण तिने कमी काळातच मोठी संपत्ती आणि लोकप्रियता आपल्या नावे केली. ती वेगाने यशाच्या शिखरावर पोहोचली आणि तेवढ्याच वेगाने ती सगळ्यांच्या नजरेपासून दूर झाली. आज तिचं नावही कुणाला आठवत नसेल. पण एकेकाळी तिचं नाव खूप चालत होतं. त्यावेळी तिची एक झलक बघण्यासाठी लोक आतुर असायचे. पण तिच्या जीवनात अनेक चढउतार आले.
विमीच्या जीवनात असे काही चढउतार आले की, ती अचानक गायबच झाली. विमी जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा ती आधीच विवाहित होती आणि दोन मुलांची आई होती. त्यानंतरही ती रातोरात स्टार बनली होती. विमी बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींपैकी एक होती ज्यांनी सुनील दत्तपासून ते शशी कपूर, राज कुमार यांच्यासोबत कामे केली. स्टारडम पाहिलेल्या विमीचा शेवट फारच वेदनादायी झाला.
विमीचा पहिला सिनेमा हमराज होता ज्यातून ती रातोरात स्टार बनली होती. त्यानंतर वचन, आबरू, पतंगा सारख्या सिनेमात ती दिसली. असं म्हणतात की, 60च्या दशकातही विमी 3 लाख रूपये मानधन घेत होती. पण नंतर तिचं जीवन इतकं वाईट झालं की, कुणी विचारही केला नसेल. पतीपासून वेगळी झाल्यानंतर ज्या व्यक्तीसोबत ती राहत होती त्याला दारूचं व्यसन लागलं आणि या व्यसनामुळेच त्याने विमीला प्रोस्टिट्यूशनकडे ढकललं.
अशात विमीच्या करिअरचे 10 वर्ष उद्ध्वस्त झाले आणि मग ती एकटी राहू लागली होती. विमीचा मृत्यूही फार वाईट होता. 34 वर्षीय विमी गंभीर आजारी झाली होती आणि पैसे नसल्याने तिला हॉस्पिटलच्या जनरल वार्डमध्ये भरती व्हावं लागलं होतं. जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा खांदा देणारंही कुणी नव्हतं. कधीकाळी लक्झरी कारमध्ये फिरणाऱ्या विमीचा मृतदेह एका लोटगाडीवरून स्मशानभूमीत पोहोचला गेला होता. विमी आपल्या पतीच्या मदतीने सिनेमात आली होती. त्यावेळी तिचे पती मोठे बिझनेसमन होते. त्यांचं नाव शिव अग्रवाल होतं.