विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेनं लग्नानंतर घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 02:06 PM2022-11-19T14:06:28+5:302022-11-19T14:07:07+5:30
Virajas Kulkarni And Shivani Rangole : अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न पार पडले.
अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला. अगदी धुमधडाक्यात त्यांचे लग्न पार पडले. तर आता लग्नानंतर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. जो त्यांच्यासाठी तसेच त्यांच्या चाहत्यांसाठी सुद्धा आनंनदायी ठरणार आहे.
विराजस आणि शिवानीने स्वतःचा नवा व्यवसाय सुरू केलाय. त्यांनी एक नवा क्लोथिंग ब्रँड सुरू केला आहे. ज्यामध्ये ते निरनिराळी टी शर्ट्स घेऊन येणार येणार आहेत. विशेष म्हणजे ही टी शर्ट्स थिएटर प्रेमींसाठी असणार आहेत. नाटकप्रेमींना लक्षात घेत शिवानी-विराजसने हा ब्रँड सुरु केला आहे. शिवाय या टी-शर्ट्सवर शांतता ठेवा नाटक सुरु आहे असे अनेक मॅसेज लिहिण्यात आले आहेत. आणखीही अशाप्रकारचे मेसेजेस असणारे टी शर्ट्स या ब्रँडद्वारे मिळणार आहेत. विरानी असं त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. तर रफू चक्करवर त्यांचे हे टी शर्ट्स मिळणार आहे. शिवानी व विराजसच्या या नव्या व्यवसायाला त्यांचे चाहते तसेच सेलिब्रिटी मंडळी शुभेच्छा देत आहेत. इतकेच नाही तर विराजसची आई आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी देखील आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या व्यवसायाचं मोठं कौतुक केलेलं आहे.
कॉलेजमध्ये असल्यापासूनच विराजस नाट्य लेखन आणि दिग्दर्शन करत होता. इथूनच त्याने थिएटरऑन या नाट्यसंस्थेची निर्मिती केलेल्या नाट्यसंस्थेला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांनाही नाटकाची आवड असल्याने याच थीमची संकल्पना मांडत टीशर्टची डिझाइन तयार केली. नाट्य प्रेमींना हे टीशर्टस नक्कीच आवडतील असा विश्वास त्यांना आहे. त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची देखील गरज आहे असे शिवानी म्हणते.
विराजस दिग्दर्शित करत असलेला व्हिक्टोरिया हा आगामी चित्रपट येत्या १६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग, आशय कुलकर्णी, हिरा सोहल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.