Virat Anushka Wedding Anniversary : 'विरुष्का'च्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण; सोशल मीडियावर एकमेकांसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 02:20 PM2022-12-11T14:20:05+5:302022-12-11T14:21:41+5:30
'विराट अनुष्का' म्हणजे सर्वांचे लाडके कपल. यांच्या लग्नाला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने दोघांनी एकमेकांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
'विराट अनुष्का' म्हणजे सर्वांचे लाडके कपल. यांच्या लग्नाला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने दोघांनी एकमेकांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. वामिकांच्या आई बाबांवर आज शुभेच्छांचाच वर्षाव होतोय. क्रिेकेटर आणि बॉलिवुडची ही फेवरेट जोडी आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. (Virat Anushka Wedding Anniversary)
अनुष्काने शेअर केले खास फोटो
अनुष्काने तर विराटचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत तर विराट ने खुपच गोड फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत. हे फोटो पोस्ट करण्यासाठी आजच्या पेक्षा आणखी कोणता खास दिवस असू शकतो असे अनुष्काने म्हणले आहे. 'परी' सिनेमाचा फोटो शेअर करत विराट नेहमीच माझ्या पाठीशी असल्याचे अनुष्काने लिहिले आहे. तसेच अनुष्काने वामिकाला जन्म दिल्यानंतर विराट हॉस्पिटलच्या बेडवर आराम करत असल्याचा फोटो तिने शेअर केला आहे.अनुष्काचे शेअर केलेले फोटो पाहून चाहत्यांच्या कमेंट भरभरुन येत आहेत.
तर दुसरीकडे विराटने दोघांचा खुपच सुंदर फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये विराटने ग्रे रंगाचा सूट घातला आहे तर अनुष्का पांढऱ्या रंगाच्या स्वेटशर्ट मध्ये दिसत आहे. या फोटोचे लोकेशन प्रेमात पाडणारे आहे. स्वच्छ आभाळाखाली दोघांचा रोमॅन्टिक फोटो आहे.
विराटने नुकतेच वनडे क्रिकेट सामन्यात शतक झळकावले. ऑगस्ट २०१९ नंतर त्याने हे शतक झळकावल्याने चाहते प्रचंड खुष आहेत. विराटचे हे अनुष्कासाठी अॅनिव्हर्सरी गिफ्टच म्हणावे लागेल. तर अनुष्का वामिकाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येणार आहे. महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीवर आधारित 'चकदा एक्सप्रेस'मध्ये तिने भुमिका साकारली आहे.