शाहरुखच्या 'चलैया' गाण्यावर मैदानावरच थिरकला विराट कोहली, व्हिडिओ पाहून अ‍ॅटली कुमारही भारावला, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 10:30 AM2023-11-07T10:30:00+5:302023-11-07T10:30:23+5:30

'जवान'मधील 'चलैया' गाण्याची भुरळ क्रिकेटर विराट कोहलीलाही पडली आहे. विराटचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

virat kohli dance on shah rukh khan chaleya song during world cup match jawan director atlee kumar reacted | शाहरुखच्या 'चलैया' गाण्यावर मैदानावरच थिरकला विराट कोहली, व्हिडिओ पाहून अ‍ॅटली कुमारही भारावला, म्हणाला...

शाहरुखच्या 'चलैया' गाण्यावर मैदानावरच थिरकला विराट कोहली, व्हिडिओ पाहून अ‍ॅटली कुमारही भारावला, म्हणाला...

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला. सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. शाहरुखच्या या चित्रपटाने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. यातील गाण्यांनाही लोकप्रियता मिळाली. जवानमधील 'चलैया' गाण्याची भुरळ क्रिकेटर विराट कोहलीलाही पडली आहे. विराटचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका वर्ल्डकप सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये जवानमधील 'चलैया' गाणं वाजवलं गेलं. हे गाणं ऐकताच विराटला त्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. क्रिकेटच्या मैदानातच कोहली शाहरुखच्या चलैया गाण्यावर थिरकताना दिसला. आयसीसीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरुन कोहलीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

विराट कोहलीचा 'चलैया' गाण्यावरील डान्स पाहून जवानचा दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारही भारावून गेला आहे. अ‍ॅटलीने विराटचा हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. "ओएमजी" असं म्हणत त्याने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. 

दरम्यान, अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत अनेक रेकॉर्ड मोडले होते. शाहरुख खान, दीपिका पदुकोण, विजय सेतुपथी, नयनतारा अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने देशांतर्गत ६४० कोटींचा तर वर्ल्डवाइड १ हजार १४० कोटींचा गल्ला जमवला.

Web Title: virat kohli dance on shah rukh khan chaleya song during world cup match jawan director atlee kumar reacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.