भारतात परतताच Anushka Sharma चा स्वॅग; चाहत्यांकडून प्रेमाचा 'विराट' वर्षाव, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 08:22 PM2024-09-04T20:22:45+5:302024-09-04T20:23:49+5:30

अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते.

virat Kohli's wife and actress Anushka Sharma attended an event on her return to India | भारतात परतताच Anushka Sharma चा स्वॅग; चाहत्यांकडून प्रेमाचा 'विराट' वर्षाव, Video

भारतात परतताच Anushka Sharma चा स्वॅग; चाहत्यांकडून प्रेमाचा 'विराट' वर्षाव, Video

anushka sharma : अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते. पण, बुधवारी ती मोठ्या कालावधीनंतर भारतात परतली. लंडनमध्ये बराच काळ घालवणारी अनुष्का तिथेच स्थायिक होणार असल्याची चर्चा आहे. अनुष्का मागील अनेक महिन्यांपासून लंडनमध्येच वास्तव्यास आहे. गेल्या काही वर्षांपासून ती सिनेइंडस्ट्रीपासूनही दूर आहे. तिने मुलगा अकायलाही लंडनमध्येच जन्म दिला. आता बऱ्याच महिन्यांनी अनुष्का मुंबई विमानतळावर दिसली. ब्लॅक कॅज्युअल आऊटफिटमध्ये तिने एन्ट्री घेतली अन् चाहत्यांनी तिचे 'विराट' असे स्वागत केले. आता मायदेशात परतताच तिने कार्यक्रमाला हजेरी लावली असता पुन्हा एकदा तिचा स्वॅग कॅमेऱ्यात कैद झाला. (anushka sharma news) 

खरे तर अनुष्का आणि तिचा पती विराट कोहली दोन्ही मुलांसह लंडनमध्येच स्थायिक झाल्याच्या चर्चा आहेत. आता अनुष्का एकटीच मुंबईत परतली आहे. ब्रँड एंडॉर्समेंट्स आणि वर्क कमिटमेंट्समुळे ती आली आहे. फुल ब्लॅक आऊटफिट, ब्लॅक गॉगल अशा लूकमध्ये दिसली. पापाराझींसमोर तिने पोज दिली आणि नंतर ती कारमध्ये बसून रवाना झाली. सेलिब्रिटी फोटोग्राफर्सने अनुष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनुष्काच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली ट्वेंटी-२० विश्वचषक झाल्यापासून लंडनमध्ये आहे. मुंबईत झालेल्या विजयाच्या मिरवणुकीनंतर किंग कोहलीने कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे पसंत केले. अभिनेत्री अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या रिलीजच्या प्रतिक्षेत आहे. नेटफ्लिक्सवर सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित झालेली नाही.


क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते जगजाहीर आहे. अनेक क्रिकेटपटूंची नावे अभिनेत्रींशी जोडले आहे. काहींनी विवाहगाठ बांधत संसार थाटला. विराट कोहली आगामी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मायदेशात परतण्याची शक्यता आहे. १९ सप्टेंबरपासून टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध कसोटी आणि त्यानंतर ट्वेंटी-२० मालिका खेळेल.

Web Title: virat Kohli's wife and actress Anushka Sharma attended an event on her return to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.