पाकिस्तानी कलावंतांनाही व्हिसाचा फटका
By Admin | Published: February 7, 2016 04:21 AM2016-02-07T04:21:59+5:302016-02-07T04:21:59+5:30
बिपाशा बसूसोबत ‘सी थ्रीडी’मध्ये काम करणारा पाकिस्तानी नायक इमरान अब्बासचे व्हिसा प्रकरण जोरदार गाजले होते. त्याला व्हिसा मिळाला नाही आणि चित्रपटाची शूटिंग थांबली. नंतर कशी
बिपाशा बसूसोबत ‘सी थ्रीडी’मध्ये काम करणारा पाकिस्तानी नायक इमरान अब्बासचे व्हिसा प्रकरण जोरदार गाजले होते. त्याला व्हिसा मिळाला नाही आणि चित्रपटाची शूटिंग थांबली. नंतर कशी तरी शूटिंग पूर्ण झाली. मात्र चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी इमरान अब्बासला भारतात येण्यासाठी व्हिसा नाकारण्यात आला. शाहरूख खानसोबत चित्रपट ‘रईस’मध्ये काम करणारी पाकिस्तानी नायिका माहिरा खानचा पाकिस्तानी चित्रपट ‘बिन रोए’ जेव्हा भारतात प्रदर्शित झाला तेव्हा शिवसेनेने तिला मुंबईत येण्यास विरोध केला. याच कारणावरून तिलाही व्हिसा नाकारण्यात आला. याचप्रकारे इमरान हाश्मीसोबत ‘राजा नटवरलाल’ चित्रपटात काम करणारी पाकिस्तानी नायिका हुमायूं मल्लिक (जिचा ‘बोल’ चित्रपट फारच गाजला होता)ला देखील व्हिसा नाही मिळाला. अली जाफर जेव्हा यशराजचा ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटात काम करीत होता तेव्हा दोनदा चित्रपटाची शूटिंग रद्द करण्यात आली. कारण त्यालाही व्हिसा मिळाला नाही. सोनमसोबत ‘खूबसूरत’मध्ये काम करणारे पाकिस्तानी कलाकार फवाहद खानसोबतचा करण जोहरचा चित्रपट ‘कपूर अॅण्ड सन्स’ची शूटिंग लंडनमध्ये झाली. कारण येथे त्याला व्हिसा मिळणे कठीण जात होते.
- ंल्ल४्न.ं’ंल्ल‘ं१@’ङ्म‘ें३.ूङ्मे
अनुपम खेर यांना पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसा मिळाला नाही. यावरून आपल्या देशात जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु फक्त भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या कलावंतांनाच असा त्रास सहन करावा लागला असे नाही. पाकिस्तानहून बॉलीवूडमध्ये आलेल्या कलाकार आणि गायकांनाही व्हिसा न मिळाल्याचा मोठा फटका बसला आहे.