‘गणवेश’ टीमची लोकमतला भेट

By Admin | Published: June 23, 2016 03:09 AM2016-06-23T03:09:22+5:302016-06-23T03:09:22+5:30

‘गणवेश’ या नावावरूनच हा चित्रपट गणवेशावर भाष्य करणारा आहे, असे वाटते. गणवेश घेण्यासाठी होणारी बापाची धडपड यामध्ये दाखविण्यात आली आहे का

Visit to 'Uniform' Team Lokmat | ‘गणवेश’ टीमची लोकमतला भेट

‘गणवेश’ टीमची लोकमतला भेट

googlenewsNext

‘गणवेश’ या नावावरूनच हा चित्रपट गणवेशावर भाष्य करणारा आहे, असे वाटते. गणवेश घेण्यासाठी होणारी बापाची धडपड यामध्ये दाखविण्यात आली आहे का, असा प्रश्नदेखील बऱ्याच जणांपुढे उपस्थित झाला आहे. परंतु, या चित्रपटात अनेक जणांचे गणवेश दाखविण्यात आले आहेत. गणवेश हा काही एकच नसतो तर तो आपल्याला प्रत्येक स्टेजवर घालावा लागतो, अशा स्वरूपाची एका वेगळ्या विषयावर आधारलेली ही ‘गणवेश’ची कथा आहे. नुकतेच गणवेशच्या संपूर्ण टीमने लोकमत कार्यालयाला दिलेल्या भेटीत या चित्रपटाविषयी अनेक पैलू उलगडले.
स्मिता तांबे या चित्रपटात आपल्याला एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलेच्या रूपात पाहायला मिळणार आहे. स्मिता तिच्या भूमिकेविषयी म्हणाली, ‘‘या चित्रपटाची कथा मला आवडल्याने मी तो स्वीकारला. रिअल लोकेशन्सवर जाऊन आम्ही तो शूट केला. वेगेळे काही तरी करण्याचा मला या चित्रपटाच्या निमित्ताने चान्स मिळाला.’’
किशोर कदम यांची या चित्रपटात एका वडिलांची भूमिका असून हा बाप त्याच्या लेकरासाठी किती धडपड करतो, या सर्व गोष्टीची कहाणी या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. मला माझ्या वडिलांची आठवण या चित्रपटाच्या निमित्ताने झाल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटात मुलाच्या गणवेशासाठी दाखविण्यात आलेली धडपड केवळ माझ्या बालपणीच्या आठवणींमुळेच मी पडद्यावर आणू शकलो, असे किशोर कदम यांनी सांगितले.
चित्रपटाचे दिग्दर्शक अतुल जगदाळे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे प्रथमच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल दिग्दर्शक सांगतात, की पोलिसांचा रांगडेपणा मुक्ता चांगला दाखवू शकते. आत्तापर्यंत तिने पोलिसांचा असा रोल कधीच केला नव्हता. मला जो इन्स्पेक्टर हवा होता तो तिने केला. त्यामुळे कदाचित तिच्याशिवाय ही भूमिका कोणीच करू शकणार नाही, असे मला वाटते. गोष्ट लिहीत असतानाच तिचा रोल फायनल झाला होता.

Web Title: Visit to 'Uniform' Team Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.