दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे स्वरा भास्करविरोधात आक्षेपार्ह ट्विट! अकाऊंट ब्लॉक!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 09:35 AM2018-09-11T09:35:40+5:302018-09-11T09:36:40+5:30
अभिनेत्री स्वरा भास्करविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला चांगलेच महाग पडले. या संपूर्ण एपिसोडदरम्यान ट्विटरने मध्यस्ती करत विवेक अग्निहोत्रीचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक केले.
अभिनेत्री स्वरा भास्करविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला चांगलेच महाग पडले. या संपूर्ण एपिसोडदरम्यान ट्विटरने मध्यस्ती करत विवेक अग्निहोत्रीचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक केले.
स्वरा भास्करने केरळचे आमदार पी सी जॉर्ज यांच्या वक्तव्याची निंदा केली होती. जॉर्ज यांनी न्यायाची मागणी करणाऱ्या एका बलात्कारपीडित ननविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले होते. स्वरा भास्करने ट्विटरवर जॉर्ज यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता. ‘घृणित आणि लज्जास्पद. भारताच्या राजकीय प्रवाहात आणि धार्मिक फुटीतील घोटाळा,’असे ट्विट तिने केले होते.
स्वराच्या या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विवेक अग्निहोत्रींचा तोल गेला आणि त्यांनी तिच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केले. ‘मीटूअंतर्गत लैंगिक शौषण आणि लैंगिक अत्याचाराविरोधात अभियान, प्लेकार्ड कुठेय? मीटूप्रॉस्ट्रिट्यूटनन’, असे ट्विट विवेक अग्निहोत्रीने केले. विवेक अग्निहोत्रीच्या या महिलांविरोधी ट्विटने स्वरा भडकली. यानंतर स्वरा आणि विवेक यांच्यात बरेच वाक्युद्ध रंगले. यापश्चात स्वराने विवेकच्या आक्षेपार्ह ट्विटविरोधात ट्विटरकडे तक्रार नोंदवली.
Thank you @TwitterIndia@TwitterSupport 4 taking cognisance of @vivekagnihotri ‘s abusive tweet. And making him delete it! No tolerance 4 cyber bullying & abuse of women on public platforms! (Or private - but one thing at a time) Thank u🙏🏿🙏🏿🙏🏿🙌🏾🙌🏾🙌🏾 #SayNoToBullyingpic.twitter.com/psYyVil7EI
— Swara Bhasker (@ReallySwara) 10 septembre 2018
स्वराच्या या तक्रारीची ट्विटरने तत्काळ दखल घेतली. तुम्ही तक्रार केलेल्या ट्विटर अकाऊंट तपासल्यानंतर ते ट्विटरच्या नियमाबाहेर असल्याचे आम्हाला आढळले. आम्ही ते अकाऊंट ब्लॉक केले, असे ट्विटरने लिहिले. ट्विटरने विवेक अग्निहोत्रीचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक करताच, स्वराने ट्विटरचे आभार मानले.
स्वरा भास्करने गेल्या काहीच वर्षांत बॉलिवूडमध्ये तिचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात स्वरा आपल्याला साहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. नंतर तिने एक अभिनेत्री म्हणून तिची एक ओळख निर्माण केली. स्वराने तनू वेड्स मनू, तनू वेड्स मनू २, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटे यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकरल्या आहेत. वीरे दे वेडिंग या चित्रपटात तिच्यावर चित्रीत करण्यात आलेला एक बोल्ड सीन चांगलाच वादात सापडला होता. पण हे दृश्य देऊन मी काहीच चुकीचे केले नाही असे स्वराचे स्पष्ट मत होते.