Vivek Agnihotri : फक्त ट्विटर का? सोडायचं तर..., करण जोहरला विवेक अग्निहोत्रींचा जोरदार टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 01:35 PM2022-10-11T13:35:30+5:302022-10-11T13:36:08+5:30
Karan Johar, Vivek Agnihotri : गुडबाय ट्विटर, म्हणत करणने ट्विटरला रामराम ठोकला. आता करणच्या या निर्णयावर ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया आली आहे.
करण जोहर (Karan Johar) सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या सततच्या ट्रोलिंगला कंटाळून कालच करणने ट्विटरला रामराम ठोकला. ‘मला माझ्या आयुष्यात सकारात्मकता, शांती हवी आहे त्यासाठी मी पहिलं पाऊल उचलतोय... गुडबाय ट्विटर,’ असं म्हणत करणने ट्विटरला रामराम (Karan Johar quit Twitter) ठोकला. आता करणच्या या निर्णयावर ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri )यांची प्रतिक्रिया आली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी करणच्या ट्विटर सोडण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत एक ट्विट केलं.
Quitters never win.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 10, 2022
Winners never quit
जिंकणारे कधी माघार घेत नाहीत आणि माघार घेणारे कधी जिंकत नाहीत, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं. या ट्विटमध्ये त्यांनी कुणाचं नाव लिहिलं नाही. पण त्यांचा इशारा करण जोहरकडेच आहे, हे ओळखायला उशीर लागला नाही. यानंतरही विवेक अग्निहोत्री यांनी आणखी एक ट्विट करत करणला लक्ष्य केलं.
I believe a genuine person seeking positive energies would leave Social Media completely. Leaving only Twitter because it doesn’t allow hypocrisy or fakeness but staying on Instagram because it gets brands and allows fakeness itself is a negative and screwed up approach to life. https://t.co/oNfwCDO8Nu
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 10, 2022
‘एखाद्याला सकारात्मकता हवी असेल तर ती सोशल मीडियापासून पूर्णपणे अलिप्त राहील. केवळ ट्विटर सोडणं हा निव्वळ ढोंगीपणा आहे. केवळ ट्विटरवर आपला अजेंडा रेटता येणार नाही म्हणून ट्विटर सोडायचं आणि इन्स्टाग्रामवर ब्रँड व जाहिराती मिळतात म्हणून तिथे सक्रिय राहायचं, याला काहीच अर्थ नाही. आयुष्याकडे बघायचा हा दृष्टिकोनच नकारात्मक आहे,’असं दुसरं ट्विट त्यांनी केलं.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहर सतत सोशल मीडियावर ट्रोल होतो आहे. घराणेशाहीवरून त्याला लोकांनी प्रचंड ट्रोल केलं. कंगना राणौत तर करणला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाही. नुकताच करणचा ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज झाला. या चित्रपटाला बॉयकॉटचा सामना करावा लागला. इतकंच नाही य चित्रपटातील चुकांवरुन, व्हीएफएक्सवरुन चित्रपट निर्माता करण जोहरवरही टीका झाली. ‘ब्रह्मास्त्र’ केलेल्या कमाईवरूनही कंगना, विवेक अग्निहोत्री यांनी करणवर टीका केली होती. या सगळ्याला कंटाळून करणने ट्विटरला रामराम ठोकला. सध्या या कृतीची सोशल मिडियावर सध्या चांगलीच चर्चा होत आहे.