विवेक ऑबेरॉय भारत सोडून दुबईत झाला स्थायिक, यामागचं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 03:03 PM2024-09-19T15:03:21+5:302024-09-19T15:03:45+5:30

Vivek Oberoi : 'साथिया' आणि 'शूटआउट ॲट लोखंडवाला' यांसारख्या चित्रपटातून रसिकांच्या मनावर छाप उमटविणारा अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या दुबईमध्ये स्थायिक आहे.

Vivek Oberoi left India and settled in Dubai, the reason behind this came to light | विवेक ऑबेरॉय भारत सोडून दुबईत झाला स्थायिक, यामागचं कारण आलं समोर

विवेक ऑबेरॉय भारत सोडून दुबईत झाला स्थायिक, यामागचं कारण आलं समोर

साथिया (२००२) आणि शूटआउट ॲट लोखंडवाला (२००७) यांसारख्या चित्रपटातून रसिकांच्या मनावर छाप उमटविणारा अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) दुबईमध्ये स्थायिक असून तिथे तो बिझनेस करतो आहे. नुकत्याच एका मुलाखतीत, अभिनेत्याने मुंबईहून दुबईला जाण्याचे कारण सांगितले. त्याने सांगितले की तो तेथे राहणार नव्हता, परंतु जीवनात काहीतरी वेगळेच लिहून ठेवले आहे.

न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉय म्हणाला, “मी सुरुवातीला काही काळासाठी माझा व्यवसाय सुरू करण्यासाठी दुबईला गेलो होतो. देव दयाळू झाला आणि आमचा व्यवसाय भरभराटीला आला. त्याचा इतका विस्तार झाला की आज आमचे ४०० लोकांचे कुटुंब आहोत. त्याच्या व्यवसायाबद्दल सांगताना, अभिनेत्याने कर्ली टेल्सला सांगितले होते की, मी भारतात परत आल्यावर एक फिनटेक कंपनी सुरू केली, ज्यामध्ये थोडासा सामाजिक दृष्टिकोन होता. ज्या मुलांना शिक्षणासाठी कर्ज मिळू शकत नाही, अशा मुलांना मदत करण्याचा उद्देश आहे. आता ही कंपनी भारतातील जवळपास ४५ लाख मुलांना शिक्षणासाठी मदत करते. मग मी एक एज्युकेशन स्टार्टअप तयार केला ज्यामध्ये फक्त लहान शहरातील मुलांवर लक्ष केंद्रित केले. ज्यांना मोठ्या शहरांमध्ये चांगले शिक्षक मिळत नाही. त्यांना आय स्कॉलर नावाचे चांगले शिक्षण मिळते. भारतात, आम्ही एक कृषी स्टार्टअप चालवतो जे ९७ लाख भारतीय शेतकऱ्यांना मदत करते. 


दुबईबद्दल विवेक म्हणाला की, दुबईमध्ये रिअल इस्टेट, मोठ्या ब्रँड्सशी त्याचे सहयोग आहे. आमची कंपनी, BnW डेव्हलपमेंट्सच्या माध्यमातून नवीन कॅसिनो येत असताना आम्ही काही अल्ट्रा लक्झरी प्रकल्प करत आहोत. आम्ही तेथे आठ बिल्डिंग बांधत आहोत. माझ्याकडे इथे थोडी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. देवाची माझ्यावर कृपा आहे, दुबई माझ्यासाठी चांगली आहे. ही इथली यशोगाथा आहे.

विवेक ऑबेरॉय गेल्या तीन वर्षांपासून राहतोय दुबईत

विवेक ऑबेरॉय गेल्या तीन वर्षांपासून दुबईत राहतो आहे. तिथे त्याचे स्वतःचे एक आलिशान घर आहे ज्यात बाग, स्विमिंग पूल आहे.  विवेक म्हणाला की, प्रत्येक वेळी मी मुंबईला जातो तेव्हा मला तिथून निघावसे वाटत नाही. तुम्ही मला विचाराल घर कुठे आहे, तरीही मी मुंबई म्हणेन. मला दुबई आवडते, मला थोडावेळ मुंबईत आणि थोडा वेळ दुबईत राहायला आवडते. हे दोन्ही जगातील सर्वोत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे.”

Web Title: Vivek Oberoi left India and settled in Dubai, the reason behind this came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.