मतदान केल्याची शाई दाखवा अन् ५० टक्के सूट मिळवा, 'या' लोकप्रिय मराठी नाटकाची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 11:53 AM2024-11-17T11:53:35+5:302024-11-17T11:56:43+5:30

लोकप्रिय नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग आणि मतदानाचा दिवस  असा योग जुळून आला आहे.

Vote In Maharashtra Assembly Elections 2024 And Get 50 Percent Discount On Tickets Of Pahile Na Mi Tula Marathi Theatre Play | मतदान केल्याची शाई दाखवा अन् ५० टक्के सूट मिळवा, 'या' लोकप्रिय मराठी नाटकाची ऑफर

मतदान केल्याची शाई दाखवा अन् ५० टक्के सूट मिळवा, 'या' लोकप्रिय मराठी नाटकाची ऑफर

सध्या देशात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024)  रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या निवडणूकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी निवडणूक आयोग तसेच स्थानिक प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी  'पाहिले न मी तुला' या नाटकाच्या निर्मात्यांनी  खास ऑफर आणली आहे.


‘पाहिले न मी तुला' या नाटकाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग आणि मतदानाचा दिवस  असा योग जुळून आला आहे. त्यामुळे नाट्यरसिकांसाठी एक  जबरदस्त ऑफर ‘पाहिले न मी तुला'  या नाटकाने आणली आहे.  या ऑफर अंतर्गत, मतदान केल्यानंतर, लोक बोटावर शाई दाखवून 'पाहिले न मी तुला' या नाटकाच्या तिकिटावर  50 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकतील.   या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग येत्या २० नोव्हेंबर रोजी दादरमधील शिवाजी मंदिर येथे दुपारी 4 वाजता रंगणार आहे.  सवलत फक्त तिकीट बारीवर उपलब्ध असणार आहे. ऑनलाइन नसणार आहे.  


 'सुमुख चित्र' आणि 'अनामिका' प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला' या नाटकाच्या  रौप्य महोत्सवी प्रयोगाचा आनंद घेत मतदानाचा हक्क बजवा, असे आवाहन या नाटकात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अंशुमन विचारे (Anshuman Vichar), हेमंत पाटील (Hemant Patil) , सुवेधा देसाई यांनी केले आहे.  मतदानाची टक्केवारी घसरत असल्याचं चित्र पाहायला मिळतेय. त्यामुळं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. यातीलच एक प्रयोग हा आहे.  दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यानंतर काही दिवसातच राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.

Web Title: Vote In Maharashtra Assembly Elections 2024 And Get 50 Percent Discount On Tickets Of Pahile Na Mi Tula Marathi Theatre Play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.