‘वन नाईट स्टँड’ ची प्रतीक्षा लांबली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 16:06 IST2016-03-27T23:52:15+5:302016-04-07T16:06:39+5:30
सनी लिओनी हिच्या ‘वन नाईट स्टँड’ या चित्रपटाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. सनीचा हॉट लूक असलेला हा चित्रपट २२ एप्रिलला रिलिज होणार असे ठरले असताना आता या चित्रपटासाठी आपल्याला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘वन नाईट स्टँड’ ची प्रतीक्षा लांबली...
स ी लिओनी हिच्या ‘वन नाईट स्टँड’ या चित्रपटाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. सनीचा हॉट लूक असलेला हा चित्रपट २२ एप्रिलला रिलिज होणार असे ठरले असताना आता या चित्रपटासाठी आपल्याला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाची रिलीज डेट २२ एप्रिलवरून २९ एप्रिलपर्यंत लांबली आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी रणदीप हुडा याचा बहुप्रतीक्षित ‘लाल रंग’ रिलीज होतोय, तेव्हा बॉक्सआॅफिसवर ‘वन नाईट स्टँड’ विरूद्ध ‘लाल रंग’ असे टशन दिसेल, यात शंका नाही. ‘वन नाईट स्टँड’ ची रिलीज डेट लांबण्याचे कारण अद्याप कळलेले नाही, पण कारण काहीही असो, सनीचे हॉट अॅण्ड हॉट दर्शन घ्यायचे म्हणजे, आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार, हे मात्र पक्के, तेव्हा करूयात!!
.....................................
ऐका व पाहा सनीच्या ‘वन नाईट स्टँड’चे गाणे
सनी लिओनी हिच्या ‘वन नाईट स्टँड’ या चित्रपटाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. चित्रपटाला रिलीज व्हायला काही आठवड्यांचा अवकाश असताना आता या चित्रपटाचे हॉट गाणे आज रिलीज झाले. या गाण्यात सनी आणि तनुज या जोडीचा जलवा पाहायचा आहे तर, बघाच..
.........................
‘वन नाईट स्टँड’चा टिझर आऊट
अभिनेत्री सनी लिओनी हिने पोर्नपटांना बाय बाय करून बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा निर्णय अगदी योग्य ठरला म्हणायला. बॉलिवूडमध्ये सनीला चांगले दिवस आले आहेत. लवकरच सनीचा ‘वन नाईट स्टँड’ हा चित्रपट येतोय. याचा टिझर आऊट झाला. निश्चितपणे या चित्रपटातही सनी बोल्ड अंदाजात दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता आणि मॉडेल तनुज विरवानी मुख्य भूमिकेत आहे. तनुजचा हा पहिला बॉलिवूडपट आहे. या चित्रपटात सनी सेलेना नामक तरूणीची तर तनुज हा उर्विल नामक तरूणाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. केवळ एका रात्रीसाठी सेलेना व उर्विल एकत्र येतात आणि यामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते. यानंत एका पाठोपाठ एक असे थरारक प्रसंग घडतात, असा हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या टिझरने त्याच्याबद्दलची उत्सूकता वाढवली आहे.