'H2O' मधून तरुणाई देणार पाणी बचतीचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 06:30 AM2019-04-01T06:30:00+5:302019-04-01T06:30:00+5:30

'H2O' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Water saving message from 'H2O' Movie | 'H2O' मधून तरुणाई देणार पाणी बचतीचा संदेश

'H2O' मधून तरुणाई देणार पाणी बचतीचा संदेश

googlenewsNext

सध्याच्या घडीला 'पाणी' हा अतिशय ज्वलंत विषय बनत चालला आहे. पाण्याच्या भीषण टंचाईवर तोडगा काढण्याचा प्रयत्न अनेक सामाजिक संस्था करत आहेत. अशा टंचाईग्रस्त भागातील लोकांनी एकत्र येऊन पाणी वाचवण्यासाठी खटपट केली पाहिजे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहिलात तरी तुमची नाळ ही नेहमी तुमच्या मुळाशीच जोडलेली असते असा संदेश देणारा 'H2O' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.


काही तरुण शहरात शिक्षणासाठी राहत असून पण शहरात असणाऱ्या भौतिक सुखाला दूर सारून पुन्हा गावाकडे वळतात. आजचा काळ हा युवकांचा आहे. त्यामुळे पाण्याचा विषय मांडतांना तो तरुण पिढीच्या नजरेतून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शह्ररी आणि ग्रामीण भागातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या तरुणांच्या भावना या चित्रपटात मांडल्या आहेत. 
या ट्रेलर सोबतच चित्रपटातील 'झालो मी बावरा' हे रोमँटिक गाणे आणि 'दिल दोस्तीचा वादा' हे कॉलेजमधील आठवणींना उजाळा देणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'झालो मी बावरा' या गाण्याचे वैशिष्टय म्हणजे या गाण्याला बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक जावेद अली यांचा आवाज लाभला आहे. तर 'दिल दोस्तीचा वादा' हे गाणे रोहित राऊत आणि केतकी माटेगावकर यांनी गायले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन मिलिंद पाटील यांनी केले असून सिनेमाची निर्मिती सुनिल झवर आणि जी. एस. प्रोडक्शन यांनी केली आहे. 'H2O' हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: Water saving message from 'H2O' Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.