हम लौट आये!

By Admin | Published: March 29, 2017 04:46 AM2017-03-29T04:46:02+5:302017-03-29T04:46:02+5:30

छोटा पडदा आता छोटा राहिलेला नाही. वषार्नुवर्षे छोट्या पडद्याचं महत्त्व आणि क्षितीजं विस्तारत गेली आहेत. रुपेरी पडद्याप्रमाणेच

We came back! | हम लौट आये!

हम लौट आये!

googlenewsNext

- suvarna jain -
छोटा पडदा आता छोटा राहिलेला नाही. वषार्नुवर्षे छोट्या पडद्याचं महत्त्व आणि क्षितीजं विस्तारत गेली आहेत. रुपेरी पडद्याप्रमाणेच छोटा पडदाही गेल्या वर्षात तितकाच लोकप्रिय ठरलाय.मालिकांमधील आपल्या अभिनयाने कलाकार घराघरातील रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांचे आणि रसिकांमध्ये एक अतूट नातं आणि अनोखं बंध जोडले गेले आहेत. या कलाकारांना पैसा, प्रसिद्धी मिळवून देण्यात छोटा पडद्याने मोलाची भूमिका बजावलीय. अनेकांच्या करियरसाठी तर छोटा पडदा जणू काही टर्निंग पॉइंट ठरला आहे. रुपेरी पडद्यावर एंट्री मारण्यासाठी छोटा पडदा एक संधी म्हणूनही पाहिलं गेलं आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला छोटा पडदा आणि मालिकांमध्ये काम करणं हवहवंसं वाटतं. याच कारणामुळे रसिकांचं दिलखुलास मनोरंजन केलेल्या कलाकारांना छोट्या पडद्यापासूनचा दुरावा काही सहन झाला नाही. त्यामुळेच की काय रसिकांच्या भेटीसाठी आणि त्यांचं मनोरंजन करण्यासाठी काही कलाकारांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. अनेक वषार्चा ब्रेक घेतल्यानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलेल्या कलाकारांना भेटूया.

आकाशदीप सेहगल
'क्योंकी साँस भी कभी बहू थी' या लोकप्रिय मालिकेत अंश या भूमिकेच्या माध्यमातून आकाशदीप सेहगल घराघरात पोहचला. या मालिकेनंतर वेगवेगळ्या शोमधून तो छोट्या पडद्यावर झळकला.कुसुम, कुछ इस तरह, कहानी हमारे महाभारत की, फिअर फॅक्टर, झलक दिखला जा पर्व 1, कॉमेडी सर्कसचे पर्व दुसरे, तसेच 2011 मध्ये तो बिग बॉसच्या पाचव्या पर्वातही झळकला. आता पुन्हा आकाशदीप सेहगलने पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग या मालिकेच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेत तो पीर मुहम्मदची व्यक्तीरेखा साकारत आहे.

किर्ती गायकवाड
सात वर्षांपूर्वी रसिकांनी किर्तीला सात फेरे, छोटी बहू आणि डान्स रियालिटी शो नच बलियेमध्ये पाहिलंय. अनेक मालिकांमध्ये तिने निगेटिव्ह शेड असलेल्या भूमिकाही साकारल्या आहेत.गेल्या अनेक महिन्यांपासून छोट्या पडद्यावर कमबॅक करायचे होतं. मात्र किर्ती एका चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत होती.ससुराल सिमर का या मालिकेतून ती तब्बल सात वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन होतंय.

मानसी जोशी रॉय
साया या मालिकेत मानसी जोशी हिनं साकारलेली सुधा ही भूमिका आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे. घरवाली उपरवाली, कुसुम यांसारख्या मालिकांमध्येही मानसी झळकली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. मात्र आता 'ढाई किलो प्रेम' या मालिकेच्या माध्यमातून ती छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. मानसीने तिच्या अभिनय कारकिर्दीत वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकदा ब्रेक घेतले. लग्न झाल्यानंतर मानसीने काही वर्षांचा ब्रेक घेतला. त्यात मुलगी लहान असल्याने पुन्हा तिने अभिनयापासून दूर राहणंच पसंत केले. लेक तीन वर्षांची असताना तिने 'कुसुम' ही मालिका केली. ही मालिका संपल्यावर लगेचच ती रोहितसोबत नच बलियेमध्ये झळकली. त्यानंतर तिने कॅमे-यामागे राहून प्रॉडक्शन हाऊसचे काम सांभाळलं. मात्र तिने पुन्हा अभिनय करावा अशी तिच्या पतीची म्हणजे रोहित रॉयची होती. त्यामुळे रोहित कायमच तिला प्रोत्साहन देत असे. पतीच्या या प्रोत्साहनामुळेच मानसी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅकसाठी सज्ज झालीय.

जुही परमार
एक, दोन वर्ष नाही तर तब्बल सात वर्षे जुहीने कुमकुम या गाजलेल्या मालिकेतून रसिकांचं मनोरंजन केलं. कुमकुम मालिकेतून सलग सात वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर या मालिकेने छोट्या पडद्यावरुन एक्झिट घेतली. मालिका संपल्यानंतर जुहीसुद्धा तिच्या वैयक्तिक आयुष्यात रमली. 2009 साली जुहीने अभिनेता सचिन श्रॉफसोबत लग्न केल्यानंतर जुही छोट्या पडद्यापासून काहीशी दूर गेली. मात्र स्वत:ला ती अभिनयापासून दूर ठेवू शकली नाही.त्यानंतर ये चंदा कानून है या मालिकेत ती झळकली. मात्र सहा ते सात वर्षांपासून जुही कोणत्याही प्रमुख भूमिकेत दिसली नाही. संतोषी माँ, तेरे लिये या मालिकांमध्ये तिनं पाहुणी कलाकार म्हणून एंट्री मारली. या दरम्यानच्या काळात मालिकांऐवजी जुहीनं रियालिटी शोला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. पती, पत्नी और वो या रियालिटी शोमध्ये पती सचिनसह जुहीचं रसिकांना दर्शन घडलं. तर 2012 साली बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून तिने एंट्री मारली. तिच्या लोकप्रियतेच्या जोरावर जुहीने त्या वर्षी बिग बॉसचे जेतेपद पटकावलं. त्यानंतर कुमकुम मालिकेप्रमाणे वषार्नुवर्षे तिनं कोणत्याही मालिकेत काम केलं नाही. मात्र आता शनी कर्मफलदाता या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. जुहीचा या मालिकेत रसिकांना डबल धमाका पाहायला मिळत आहे. संग्या आणि छाया अशा दोन भूमिका ती साकारत आहे.

Web Title: We came back!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.