'आश्रम ३'मध्ये पम्मीसोबत इंटिमेट सीन्स कसे शूट केले? 'भोपा स्वामी' म्हणाला, "मी तिला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:11 IST2025-03-11T18:11:12+5:302025-03-11T18:11:42+5:30
सीरिजमध्ये अभिनेत्री अदिती पोहनकरने इंटिमेट सीन दिले आहेत. तिचा कोस्टार चंदन रॉल सान्यालने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

'आश्रम ३'मध्ये पम्मीसोबत इंटिमेट सीन्स कसे शूट केले? 'भोपा स्वामी' म्हणाला, "मी तिला..."
सध्या ओटीटीवर 'आश्रम ३' (Aashram 3) ची चर्चा आहे. अनेक दिवसांपासून चाहते 'आश्रम'च्या पुढील सीझनची वाट बघत होते. बॉबी देओल, चंदन रॉय सान्याल (Chandan Roy Sanyal) आणि अदिती पोहनकर (Aditi Pohankar) सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये अदितीने अनेक इंटिमेट सीन्सही दिले आहेत. तसंच तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. अदिती आणि चंदनच्या इंटिमेट सीन्सची खूप चर्चा आहे. आता नुकतंच चंदनने हे सीन कसे शूट केले याचा खुलासा केला.
बॉलिवूड हंगामाशी बोलताना चंदन रॉय सान्याल म्हणाला, "प्रकाशजी ज्यांना इतक्या वर्षांचा दिग्दर्शनाचा अनुभव आहे ते होतेच. सेटवर इतर फारसं कोणी नसतं. प्रकाश आमचा डीओपी होता. दोन तीन मुली होत्या जेणेकरुन अदितीला कंफर्टेबल वाटेल. ती सुद्धा खूप प्रोफेशनल आहे. मी ऑफ कॅमेराही तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न केला. तिला कंफर्टेबल केलं."
या सीरिजमध्ये माझं आणि अदितीचं वेगळं नातं दाखवण्यात आलं आहे. माझं भोपा स्वामी हे कॅरेक्टर अतिशय क्रूर आहे ज्याला कशाचाच फरक पडत नाही. तर अदिती त्याच्यावर अशी काय जाळं टाकते ज्यात तो फसतो. मी तिच्यासोबत चर्चा केली. तिचा विश्वास जिंकला. काही महिने आम्ही शूट केलं त्यात आम्ही मित्र झालो. एकत्र जेवण करायचो. मग जेव्हा इंटिमेट सीन शूट करायचा असतो तेव्हा आम्ही आधीच एकमेकांसोबत कंफर्टेबल झालेलो असतो."
"अशा प्रकारे बाँड बनवणं गरजेचंच असतं. कारण एकप्रकारे पाहिलं तर हे जग महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी कठीणच आहे. त्यांच्यासाठी बनलंत नाहीए. त्यामुळे तुम्हाला प्रेम, विश्वास, काळजी या दृष्टीने सर्वकाही करावं लागतं. सीरिजमध्ये भोपा स्वामीच्या माध्यमातून मी अदितीसोबत तेच दाखवलं. तसंच दिग्दर्शक, इतर टीम यांच्यामुळेच ते शक्य होतं. दिग्दर्शकाने ती कंफर्टेबल स्पेस सेटवर बनवली त्याचा खूप फायदा झाला."