अभिनेत्याने दीड वर्षांपासून खाल्ली नाही साखर, भूमिकेसाठी केलं कडक डाएट; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 10:52 IST2025-01-04T10:50:46+5:302025-01-04T10:52:09+5:30
भात आणि पोळीही वर्ज्य, केवळ उकडलेल्या अन्नावरच जगतोय 'हा' अभिनेता

अभिनेत्याने दीड वर्षांपासून खाल्ली नाही साखर, भूमिकेसाठी केलं कडक डाएट; म्हणाला...
अभिनयासाठी कलाकार काहीही करु शकतात. ते साकारत असलेलं पात्र खरं वाटावं म्हणून कलाकार बरीच मेहनत घेतात. शारिरीररित्याही खूप बदल करतात. कडक डाएट फॉलो करतात. असाच एक अभिनेता ज्याने तब्बल दीड वर्ष ना भात ना पोळी आणि ना ही साखरेची चव चाखली. वेब सीरिजमधील एका भूमिकेसाठी त्याने हे पाळलं. कोण आहे तो अभिनेता?
नेटफ्लिक्सवर नुकतीच 'ये काली काली आँखे' सीरिजचा सीझन २ रिलीज झाला आहे. यामध्ये टीव्ही अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) मुख्य भूमिकेत आहे. त्याने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली. त्याने यासाठी खाण्यापिण्यावर खूप नियंत्रण ठेवलं. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "हे खूपच अवघड होतं. गेल्या दीड वर्षांपासून मी साखर, पोळी, भात अगदी ब्रेडलाही हात लावलेला नाही. हे अजिबातच सोपं नाही. प्रत्येक भूमिकेसाठी तुम्हाला मासिकरित्याही तयार व्हावं लागतं."
तो पुढे म्हणाला, "मी मोठा खवय्या आहे आणि मला तेच सोडावं लागलं. दीड वर्ष मी एकाच प्रकारचं अन्न जेवत आहे. फक्त उकडलेल्या गोष्टी खात आहे. त्याला काहीच चवही नसते. पण नंतर मला ते आवडायला लागलं. आता माझी जीवनशैलीच अशी झाली आहे की मी कधी काही अनहेल्दी खाल्लं तर मला ते सूट करत नाही. मी तूप खाऊ शकतो, पण जर खूप खाल्लं तर माझं शरीर ते नाकारतं. मी लवकर म्हणजे रात्री साडेनऊपर्यंत तर झोपतो आणि सकाळी चार वाजताच उठतो."