'रात जवां है' सीरिजमधून अभिनेता सुमीत व्यासचे दिग्दर्शनात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 07:30 PM2024-10-01T19:30:46+5:302024-10-01T19:31:10+5:30

Sumeet Vyas : अभिनेता सुमीत व्‍यास 'रात जवां है' सीरिजमधून दिग्‍दर्शक म्‍हणून पदार्पण करत आहेत. ही सीरिज ११ ऑक्‍टोबरपासून सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होत आहे.

Actor Sumeet Vyas made his directorial debut with the series 'Raat Jawan Hai' | 'रात जवां है' सीरिजमधून अभिनेता सुमीत व्यासचे दिग्दर्शनात पदार्पण

'रात जवां है' सीरिजमधून अभिनेता सुमीत व्यासचे दिग्दर्शनात पदार्पण

अभिनेता सुमीत व्‍यास 'रात जवां है' (Raat Jawan Hai) सीरिजमधून दिग्‍दर्शक म्‍हणून पदार्पण करत आहेत. ही सीरिज ११ ऑक्‍टोबरपासून सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होत आहे. सुमीत यांनी या सिरीजमधील कथानकामध्‍ये नवीन आणि लक्षवेधक दृष्टीकोन आणला आहे, जो तीन मित्रांच्‍या सर्वोत्तम, विनोदी व संबंधित अनुभवांना सादर करतो, जेथे हे तीन मित्र पालकत्‍वाच्‍या धमाल व गोंधळपूर्ण गुंतागूंतींमधून जातात. 

सुमीत व्‍यास म्‍हणाला की, ''मला कलाकरांना जबरदस्‍तीने सीन्‍स करायला लावणे आवडत नाही. मी त्‍याप्रती विचारशील व सर्वोत्तम दृष्टीकोनाचा अवलंब करतो आणि प्रत्‍येक कलाकाराच्‍या अद्वितीय क्षमतांवर लक्ष केंद्रित करतो. मी अनेकवेळा रिटेक घेणे टाळतो, ज्‍याद्वारे उत्‍स्‍फूर्ततेच्‍या माध्‍यमातून वास्‍तविक क्षणांना कॅप्‍चर करण्‍याचा प्रयत्‍न करतो. सेटवर, मी शिस्‍तबद्धतेला प्राधान्‍य देतो, शांतमय वातावरणाची खात्री घेतो, ज्‍यामुळे कलाकारांना शांतपणे प्रोजेक्‍टबाबत विचार करण्‍यास, प्रयोग करण्‍यास वेळ मिळतो आणि सुरक्षित असल्‍यासारखे वाटते. मी आशा करतो की, या सीरिजच्‍या कलाकारांसोबत मी केलेल्या मजामस्तीमुळे त्‍यांना देखील माझ्यासोबत काम करायला आवडले असेल.''   


तो पुढे म्‍हणाला, ''काहीतरी भावूक व सर्वोत्तम गोष्‍टींना एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍याचा अनुभव उत्‍साहवर्धक होता, जे मी केलेल्‍या किंवा भाग असलेल्‍या प्रखर कथानकांपेक्षा वेगळे होते. मी आशा करतो की, पालकत्‍वावरील हे हलके-फुलके कथानक त्‍याचे चित्रीकरण करताना आम्‍ही केलेल्‍या धमालीप्रमाणे प्रेक्षकांना देखील आवडेल.''  यामिनी पिक्‍चर्स प्रा. लि. द्वारे निर्मित या सिरीजचे लेखन व निर्मिती ख्‍याती आनंद- पुथरन यांनी केले आहे आणि अत्‍यंत प्रतिभावान सुमीत व्‍यास यांनी दिग्‍दर्शन केले आहे. तसेच या सिरीजचे निर्माते विकी विजय आहेत. या कॉमेडी-ड्रामामध्‍ये बरूण सोबती, अंजली आनंद व प्रिया बापट यांसारखे प्रतिभावान स्‍टार कलाकार आहेत. 
 

Web Title: Actor Sumeet Vyas made his directorial debut with the series 'Raat Jawan Hai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.