अडल्ट व्हिडिओ शूटप्रकरणी २ अभिनेत्री अन् एका अभिनेत्याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 16:14 IST2023-11-07T16:12:33+5:302023-11-07T16:14:21+5:30
या अडल्ट फिल्मची लाईव्ह स्ट्रीमिंग 'पीहू' या सबस्क्रीप्शन बेस्ड अॅपवर होत होती. आता या अॅपला प्ले स्टोरवरुन हटवण्यात आलं आहे.

अडल्ट व्हिडिओ शूटप्रकरणी २ अभिनेत्री अन् एका अभिनेत्याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
मुंबईच्या अंधेरी भागातून २ अभिनेत्री आणि एका अभिनेत्याला अडल्ट फिल्म शूट करताना आणि ते ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीम केल्याप्रकरणी अटक झाली आहे. या अडल्ट फिल्मची लाईव्ह स्ट्रीमिंग 'पीहू' या सबस्क्रीप्शन बेस्ड अॅपवर होत होती. आता या अॅपला प्ले स्टोरवरुन हटवण्यात आलं आहे. मुंबईपोलिसांनी रविवारी ही कारवाई केली आहे.
२० आणि ३४ वर्ष अभिनेत्री आणि २७ वर्षीय अभिनेता असे तिघे जण अडचणीत सापडले आहेत. हे तिघेही अंधेरी वेस्ट भागात अश्लील व्हिडिओ शूट करत होते. इतकंच नाही तर 'पीहू' या अॅपवर ते लाईव्ह स्ट्रीमिंग करत होते. हा प्रकार यूके बेस्ड Onlyfans प्लॅटफॉर्मसारखाच होता जिथे पॉर्न फिल्म प्रोड्युस होतात. प्रायव्हेट कंटेटसाठी इथे युझर्स महिन्याला पैसेही भरतात.
वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एक आठवड्यापूर्वी लोकल खबरीकडून या अॅपवर अशा प्रकारचे व्हिडिओ पोस्ट होतात अशी सूचना मिळाली होती. दरम्यान पोलिसांनी अंधेरी फोर बंग्लोज, अंधेरीतील शूटिंगच्या मध्येच छापा मारण्याची तयारी केली होती. रविवारी त्यांनी धाड टाकली आणि आरोपींना रंगेहाथ पकडलं. या प्रकरणामागे आणखी कोणी मास्टरमाईंड आहे का याचा तपास सुरु आहे. तसंच या तीन आरोपींविरोधात आयपीसी कलम 292 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.