लेकीच्या जन्मानंतर अली फजलच्या हाती लागली 'ही' वेबसीरिज, समंथा रुथ प्रभूसोबत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 05:58 PM2024-07-24T17:58:27+5:302024-07-24T17:59:15+5:30

फुलवा खामकरचा सख्खा भाऊ सीरिजचं दिग्दर्शन करणार आहे.

Ali Fazal and Samantha Ruth Prabhu to share screen in upcoming webseries Rakta Brahmand | लेकीच्या जन्मानंतर अली फजलच्या हाती लागली 'ही' वेबसीरिज, समंथा रुथ प्रभूसोबत झळकणार

लेकीच्या जन्मानंतर अली फजलच्या हाती लागली 'ही' वेबसीरिज, समंथा रुथ प्रभूसोबत झळकणार

'मिर्झापूर' सीरिजमुळे चर्चेत आलेला गुड्डू भैय्या म्हणजेच अभिनेता अली फजलला (Ali Fazal) मोठी लॉटरी लागली आहे. आधी नुकत्याच रिलीज झालेल्या 'मिर्झापूर 3' सीरिजला तुफान प्रतिसाद मिळतोय. त्यात आता वैयक्तिक आयुष्यात तो गोंडस लेकीचा बाबा झाला आहे. दरम्यान अली फजलला साऊथ अभिनेत्री समंथा प्रभूसोबत (Samantha Ruth Prabhu) वेब सीरिज ऑफर झाली आहे. याबद्दलच जाणून घेऊया.

अली फजल आणि समंथा रुथ प्रभू आगामी 'रक्त ब्रह्मांड' सीरिजमध्ये झळकणार आहेत. ही सीरिज पीरियड फँटसी थ्रिलर ड्रामा आहे. राही बर्वेसोबत राज आणि डीके सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत. राही बर्वे हा नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरचा सख्खा भाऊ आहे. मीडिया रिपोर्टनुसार, "राज आणि डीकेचा हा अद्भूत प्रोजेक्ट आहे. फँटसी, ड्रामा जॉनरमध्ये त्यांचं काम आणखी उंचावत आहे. सीरिजची कास्ट फायनल झाली आहे आणि पुढील आठवड्यात शूटिंगलाही सुरुवात होणार आहे. ऑगस्ट महिन्यात अली पुन्हा काम सुरु करणार आहे. अली या सीरिजसाठी खूप उत्सुक आहे."

'रक्त ब्रह्मांड' सीरिजचे 6 एपिसोड असणार आहेत. यामध्ये आदित्य रॉय कपूर आणि वामिका गब्बीही मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेत्री समंथा तिच्या आजारपणानंतर कमबॅक करायला तयार आहे. एकूण सीरिजचं टायटल आणि कास्ट लक्ष वेधून घेणारी आहे. सीरिजची स्टोरी नेमकी काय असेल याकडे आता चाहत्यांचं लक्ष आहे.

Web Title: Ali Fazal and Samantha Ruth Prabhu to share screen in upcoming webseries Rakta Brahmand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.