अभिनेता सुबोध भावेच्या डोक्यावर बिरबलाचा 'ताज', जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 08:56 PM2023-02-15T20:56:41+5:302023-02-15T20:57:07+5:30
Subodh Bhave : ‘ताज : डिव्हायडेड बाय ब्लड’ ही वेबमालिका लवकरच ‘झी ५’वर प्रदर्शित होणार आहे. या वेबमालिकेची घोषणा नुकतीच एका रंगतदार सोहळ्यात करण्यात आली.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हिंदीतही स्थिरस्थावर होत आहे. मालिका, नाटक, सिनेमा या तीन माध्यमांसोबत वेब सिरीजमध्येही सुबोध काम करत आहे. नुकतीच 'ताज - डिवायडेड बाय ब्लड' (Taj) या आजवरच्या सर्वांत मोठ्या ओरिजिनल सिरीजची घोषणा करण्यात आली आहे. मुघल साम्राज्यातील वारसानाट्ये आणि अंतर्प्रवाहांबद्दल 'ताज' भाष्य करणार आहे. यात सुबोधच्या डोक्यावर बिरबलाचा 'ताज' सजल्याचं पहायला मिळणार आहे. ‘ताज : डिव्हायडेड बाय ब्लड’ ही वेबमालिका लवकरच ‘झी ५’वर प्रदर्शित होणार आहे. या वेबमालिकेची घोषणा नुकतीच एका रंगतदार सोहळ्यात करण्यात आली.
'ताज'मध्ये अकबराच्या भूमिकेत नसीरुद्दीन शाह, तर अनारकलीच्या भूमिकेत अदिती राव हैदरी आहे. शहजादा सलीमच्या भूमिकेत आशीम गुलाटी, शहदाजा मुरादच्या बूमिकेत ताहा शाह आणि शहजादा दानियालच्या भूमिकेत शुभम कुमार मेहरा आहे. राणी जोधाबाईच्या भूमिकेत संध्या मृदुल, राणी सलीमाच्या भूमिकेत झरीना वहाब, मेहरुन्नीसाच्या भूमिकेत सौरसेनी मैत्रा आहे. राहुल बोस मिर्झा हकीमची भूमिका करत आहे, तर धर्मेंद्र शेख सलीम चिस्ती यांच्या भूमिकेत आहेत. तगड्या कलाकारांच्या या फौजेमध्ये सुबोधसारखा हरहुन्नरी अभिनेता आपला ठसा उमटवताना दिसणार आहे.
‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’ या शोमध्ये सम्राट अकबराचा कार्यकाळ दाखवण्यात आला आहे. आपल्या भव्यदिव्य गादीसाठी पात्र वारसाच्या शोधातील अकबर यात दाखवण्यात आला आहे. अकबरानंतरच्या पिढ्या कशा उदयाला आल्या व त्यांचे पतन कसे झाले हे या मालिकेत नाट्यमय पद्धतीने दाखवले आहे. या महान घराण्याची शान व क्रौर्य यामध्ये दाखवले आहे. मुघलांना कला, काव्य व स्थापत्याबद्दल वाटणारे प्रेम आणि त्याच वेळी सत्तेसाठी स्वत:च्याच कुटुंबातील सदस्यांबाबत थंड डोक्याने त्यांनी घेतलेले निर्णय या शोमध्ये दाखवण्यात आले आहेत.