प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; बॉबी देओलचा 'आश्रम 4' लवकरच येणार, जाणून घ्या रिलीज डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 13:50 IST2024-02-10T13:49:32+5:302024-02-10T13:50:13+5:30
Aashram season 4: मध्यंतरी बॉबी देओलच्या करिअरला उतरती कळला लागली होती. मात्र, आश्रम आणि animal या वेबसीरिज, सिनेमामुळे पुन्हा एकदा त्याच्या करिअरचा ग्राफ उंचावला.

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; बॉबी देओलचा 'आश्रम 4' लवकरच येणार, जाणून घ्या रिलीज डेट
बॉलिवूडचा हिमॅन अर्थात धर्मेंद्र (dharmendra) यांचं संपूर्ण कुटुंब सध्या चांगलंच चर्चेत आहे. अलिकडेच सनी देओलचा (sunny deol) 'गदर 2' हा सिनेमा रिलीज झाला. तर, दुसरीकडे त्यांच्या लेकीचा ईशा देओलचा (esha deol) १२ वर्षांचा संसार मोडला. त्यामुळे सध्या देओल कुटुंबाची कलाविश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे. यामध्येच आता बॉबी देओलची (bobby deol) सुपरहिट ठरलेली ' आश्रम 4' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सीरिजची नवीन अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आता आश्रम 4 पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक झाले आहेत.
मध्यंतरी बॉबी देओलच्या करिअरला उतरती कळला लागली होती. मात्र, आश्रम आणि animal या वेबसीरिज, सिनेमामुळे पुन्हा एकदा त्याच्या करिअरचा ग्राफ उंचावला. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आश्रमच्या माध्यमातून बॉबीने ओटीटीवर पदार्पण केलं आणि त्याची नवीन ओळख निर्माण केली.
मीडिया रिपोर्टनुसार, आश्रम सीझन 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एमएक्स प्लेअरवर ही सीरिज रिलीज होणार आहे. 2024 च्या शेवटी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी अद्याप तरी सीरिजच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 2020 मध्ये या सीरिजचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सीझन गाजल्यानंतर दुसरा आणि तिसरा सीझन सुद्धा रिलीज झाला.