जपनाम जपनाम... बहुप्रतीक्षित 'आश्रम 4' सिरीजबद्दल मोठी अपडेट समोर, कधी होणार प्रदर्शित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 09:12 IST2025-01-10T09:12:14+5:302025-01-10T09:12:56+5:30

दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या 'आश्रम' सिरीजच्या चौथ्या भागाची प्रेक्षख आतुरतेने वाट पाहत आहेत.

Bobby Deol Superhit Web Series Aashram Season 4 Release Date Know Details | जपनाम जपनाम... बहुप्रतीक्षित 'आश्रम 4' सिरीजबद्दल मोठी अपडेट समोर, कधी होणार प्रदर्शित?

जपनाम जपनाम... बहुप्रतीक्षित 'आश्रम 4' सिरीजबद्दल मोठी अपडेट समोर, कधी होणार प्रदर्शित?

Aashram Season ४ Release Date:  अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) प्रकाश झा दिग्दर्शित  'आश्रम' (Ashram) या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता.  या सीरिजचे तीन सीझन तुफान हिट झाले. चौथा सीझन देखील प्रतिक्षेत आहे. चाहते या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिरिजचा चौथा सिझनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आश्रम ४  रिलीज डेटविषयी माहिती सध्या समोर आली आहे. 

आश्रमच्या चौथ्या सीझनची प्रदर्शनाची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. पण अनेक रिपोर्टनुसार, हा सीझन २०२५ मध्ये मार्च किंवा एप्रिल महिन्यात प्रदर्शित होऊ शकतो. २०२० मध्ये, प्रकाश झा यांनी एमएक्स प्लेअरवर 'आश्रम' मालिकेचा पहिला सीझन आणला होता. यानंतर २०२२ पर्यंत एकूण तीन भाग प्रदर्शित झाले. 'आश्रम'चे तिन्ही भाग तुम्ही Amazon MX Player वर पाहू शकता. चौथ्या भागाची अधिकृत घोषणा २०२२ मध्येच करण्यात आली होती. आता लवकरच सीरिजच्या रीलिज डेटची घोषणा केली जाऊ शकते. 

 'आश्रम' या सीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा हे बॉलिवूडमधलं दिग्गज नावं मानलं जातं. त्यांची सिनेमा बनवण्याची खास शैली आहे. एखादा सामाजिक मुद्दा घेऊन त्याची व्यवसायिक बॉलिवूडपटाच्या शैलीत हाताळणी करणं, ही झा यांची खासियत आहे. तर बाबा निरालाच्या भूमिकेत बॉबी देओलने ओटीटी माध्यमावर पदार्पण केलं होतं. बॉबी देओलच्या करिअरला मध्यंतरी त्या उतरती कळा लागल्याचं पाहायला मिळत होतं. पण, आश्रम या सिरिजमुळे आणि अॅनिमल या सिनेमामुळे बॉबी देओल प्रेक्षकांच्या भेटीला आला.  बॉबी देओलचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट 'कांगुवा' होता. ज्यामध्ये त्याने एका भयानक खलनायकाची भूमिका साकारली होती. आता २०२५ मध्ये बॉबी देओलच्या आगामी चित्रपटांमध्ये 'हाऊसफुल ५', 'वेलकम टू द जंगल' आणि 'थलापथी ६९' यांचा समावेश आहे. 
 

Web Title: Bobby Deol Superhit Web Series Aashram Season 4 Release Date Know Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.