भारतातील पहिलीवहिली वेब सीरिज कोणती होती माहितये? आजही तितकीच लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:53 IST2025-03-31T15:53:11+5:302025-03-31T15:53:34+5:30

भारतातील पहिल्या वेब सीरिजचे तिन्ही सीझन ठरले होते सुपरहिट! पाहिली नसेल तर आताच पाहा

Do You Know Which Is The First Indian Web Series | भारतातील पहिलीवहिली वेब सीरिज कोणती होती माहितये? आजही तितकीच लोकप्रिय

भारतातील पहिलीवहिली वेब सीरिज कोणती होती माहितये? आजही तितकीच लोकप्रिय

ओटीटी आणि वेब सिरीज पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोक काही वेब सिरीज बघत आहेत तर काही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार, झी ५ असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत. ज्यावर दररोज नवनवीन सीरिज प्रदर्शित होतात.  पण तुम्हाला भारताची पहिली वेबसीरिज कोणती होती हे माहितीये का? तर याबद्द आपण जाणून घेऊया. 

भारताचा पहिली वेब सिरीज ही कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाही तर यूट्यूबवर प्रदर्शित झाली होती.  'पर्मनंट रूममेट्स' ( Permanent Roommates ) असं सीरिजचं नाव होतं. यामध्ये सुमित व्यास (Sumeet Vyas) आणि निधी सिंह (Nidhi Singh) हे मुख्य भुमिकेत होते. ही सीरिज प्रचंड लोकप्रिय झाली होती. पहिला सीझन हीट झाल्यानंतर  दुसरा सीझन २०१६ मध्ये आला होता. त्यानंतर ७ वर्षांनी २०२३ मध्ये तिसरा सीझन प्रदर्शित झाला होता. आडोक्याला फारसा ताप न देता आजच्या पिढीतील युवा दाम्पत्याच्या जीवनातले भावनिक आलेख दाखवणारी ही सीरिज आजही चाहते  मोठ्या आवडीने पाहतात.

‘पर्मनंट रूममेट्स’ वेब सीरिजमध्ये मिकेश (सुमीत व्यास) आणि तानिया (निधी सिंह) यांचं कथा दाखवण्यात आली होती. ते तीन वर्षांपासून लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यापूर्वी १५ दिवसच त्यांनी सोबत घालवले आहेत.  मिकेश अमेरिकेत तीन वर्ष नोकरीसाठी राहिलेला तरुण मुलगा असतो. तो तानियाला सरप्राईज द्यायचं म्हणून भारतात येतो. लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये असलेले मिकेश आणि तानिया हे लिव्ह इनमध्ये राहायला लागतात.  त्यानंतर दोघं अनेक आव्हानांना सामोरे जाताना दाखवण्यात आलं आहे. जर तुम्ही ही सीरिज अजून पाहिली नसेल तर या सीरिजचे  पहिले दोन भाग तुम्ही झी5 आणि तिसरा भाग अमेझॉन प्राईमवर पाहू शकता.   

Web Title: Do You Know Which Is The First Indian Web Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.