'माहित नाही कसं सहन करतोय', पवित्रा पुनियासोबत ब्रेकअपनंतर व्यक्त झाला एजाज खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 16:32 IST2024-06-28T16:28:58+5:302024-06-28T16:32:19+5:30
गेल्याच वर्षी दोघांच्या नात्यात दुरावा आला. नुकतंच एजाजने ब्रेकअपचं दु:ख व्यक्त केलं आहे.

'माहित नाही कसं सहन करतोय', पवित्रा पुनियासोबत ब्रेकअपनंतर व्यक्त झाला एजाज खान
'सिटी ऑफ ड्रीम्स' या गाजलेल्या वेबसीरिजमध्ये इन्स्पेक्टर वसीम खानची भूमिका साकारणारा अभिनेता एजाज खान (Eijaz Khan) चर्चेत आहे. 'बिग बॉस 14' मधून एजाज खानला लोकप्रियता मिळाली होती. बिग बॉसच्या घरातील सदस्य पवित्रा पुनियासोबत (Pavitra Punia) त्याचं अफेअर चर्चेत होतं. घरातून बाहेर पडल्यानंतरही त्यांचं रिलेशनशिप सुरु होतं. अगदी लग्नाचेही प्लॅन्स होते. मात्र गेल्याच वर्षी दोघांच्या नात्यात दुरावा आला. नुकतंच एजाजने ब्रेकअपचं दु:ख व्यक्त केलं आहे.
फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत एजाजला काम आणि नात्यांमधल्या अपयशाबद्दल विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला, "आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींना डील करत असता. आता ती गोष्ट किंवा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात किती महत्वाची आहे यावरही हे अवलंबून आहे. मला वाटतं तुमचं कामच तुमची मदत करु शकतं. "
तो पुढे म्हणाला, "स्वत:समोर एकच उद्देश्य ठेवा आणि काम करा. ब्रेकअप झाल्यानंतर मलाही माहित नाही मी ते कसं डील करतोय. काही चांगले दिवस असतात तर काही वाईटही असतात. मी प्रेमात विश्वास गमावलेला नाही. मला खात्री आहे जर मी खरं प्रेम करेन तर माझं प्रेमच जिंकेल."
एजाज खान नुकताच 'अदृश्यम' या वेबसीरिजमध्ये दिसला. यामध्ये दिव्यांका त्रिपाठीही होती. एजाज खान 'सिटी ऑफ ड्रीम्स' मुळे चांगलाच चर्चेत आला. त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं.