फवाद खानच्या भारतीय चाहत्यांसाठी पर्वणी, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतील त्याची वेबसीरिज 'बरजख'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 04:35 PM2024-07-23T16:35:45+5:302024-07-23T16:36:31+5:30

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Fawad Khan, Sanam Saeed's series Barzakh watch on zee5 | फवाद खानच्या भारतीय चाहत्यांसाठी पर्वणी, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतील त्याची वेबसीरिज 'बरजख'

फवाद खानच्या भारतीय चाहत्यांसाठी पर्वणी, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतील त्याची वेबसीरिज 'बरजख'

Fawad Khan : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात अनेक चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत असतात. रुपेरी पडदा, टेलिव्हिजन आणि युट्यूबपेक्षा ओटीटीवर कंटेंटचा भडीमार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक धमाकेदार चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज झाले. या आठवड्यातही ओटीटीवर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची नवी कोरी वेबसीरिज 'बरजख' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. 

असीम अब्बासी दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये फवादसोबत पाकिस्तानी अभिनेत्री सनम सईदही काम करत आहे. फवाद खान आणि सनम सईद यांची वेब सीरिज 19 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीज झाली आहे. भारतीय प्रेक्षक एकावेळी या वेब सीरिजचे दोनच भाग पाहू शकतात. या वेब सिरीजचे नवीन भाग दर मंगळवार आणि शुक्रवारी रात्री 8 वाजता ZEE5 वर प्रसारित केले जात आहेत. फवादच्या या सीरिजचे नाव 'बरजख' जरा हटके आहे. याचा अर्थ काय होतो, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर 'बरजख'  म्हणजे 'अडथळा'. 

फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता व निर्माता आहे. गायक अशीही त्याची ओळख आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे. खूबसुरत, ऐ दिल है मुश्किल, कपूर अँड सन्स यांसारख्या अनेक चित्रपटात फवादने त्याच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. मात्र पाकिस्तानी कलाकांराना भारता काम करू देण्याबद्दल अनेकांनी निषेध व्यक्त केल्यावर हे प्रकरण बरंच तापलं आणि त्यानंतर फवाद हिंदी चित्रपटांत दिसला नाही. आता बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा पुढचा प्रोजेक्ट अभिनेत्री वाणी कपूरसोबत असणार आहे. 

Web Title: Fawad Khan, Sanam Saeed's series Barzakh watch on zee5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.