बाबा सिद्दिकींची हत्या ते सलमानला धमकी, लॉरेन्स बिश्नोईवर येणार वेब सीरिज, कोण साकारणार गँगस्टरची भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 11:11 AM2024-10-19T11:11:20+5:302024-10-19T11:18:52+5:30

बाबा सिद्दिकी हत्या आणि सलमान खान धमकी प्रकरण ताजं असतानाच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर वेब सीरिज येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

gangster lawrence binshoi web series announced salman khan baba siddique to be | बाबा सिद्दिकींची हत्या ते सलमानला धमकी, लॉरेन्स बिश्नोईवर येणार वेब सीरिज, कोण साकारणार गँगस्टरची भूमिका?

बाबा सिद्दिकींची हत्या ते सलमानला धमकी, लॉरेन्स बिश्नोईवर येणार वेब सीरिज, कोण साकारणार गँगस्टरची भूमिका?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला आहे. बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी घेतली. त्याबरोबरच पुन्हा बॉलिवूड अभिनेता सलमान खानला बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी हत्या आणि सलमान खान धमकी प्रकरण ताजं असतानाच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर वेब सीरिज येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

लॉरेन्स - अ गँगस्टर स्टोरी असं या वेब सीरिजचं नाव असून लवकरच ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जानी फायर फॉक्स फिल्म प्रोडक्शनद्वारे लॉरेन्स बिश्नोईच्या वेब सीरिजची घोषणा करण्यात आल्याची माहिती न्यूज १८ने दिली आहे. या वेब सीरिजमधून लॉरेन्स बिश्नोईचा गँगस्टर होण्यापर्यंतच्या प्रवासाचा उलगडा करण्यात येणार आहे. क्राइमच्या दुनियेत गँगस्टरची एन्ट्री कशी झाली, याबाबत सीरिजमध्ये दाखविण्यात येणार आहे. आत्तापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये बिश्नोईचं नाव समोर आलेलं आहे. याचा उलगडादेखील वेब सीरिजमध्ये होणार असल्याचं समजत आहे. 

या वेब सीरिजमध्ये लॉरेन्सची भूमिका कोणता अभिनेता साकारणार, हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर लॉरेन्स बिश्नोईच्या या वेब सीरिजचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या पोस्टरमधूनच बिश्नोईची भूमिका कोण साकारणार, याचा उलगडा देखील होणार आहे. 

Web Title: gangster lawrence binshoi web series announced salman khan baba siddique to be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.