तो माझ्याशी जास्त बोलतच नाही, कारण...; 'पंचायत'मधील सचिवजी आणि रिंकीचं वेगळंच बॉण्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 10:32 AM2024-06-10T10:32:31+5:302024-06-10T10:33:10+5:30

अलिकडेच 'पंचायत ३' (Panchayat Web Series) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजच्या तिसऱ्या सीझनलाही चांगला प्रतिसाद मिळाला. या सीरिजमध्ये सचिवजीची भूमिका अभिनेता जितेंद्र कुमार(Jitendra Kumar)ने आणि रिंकीची भूमिका संविका(Sanvika)ने साकारली आहे. तिन्ही सीरिजमध्ये सचिवजी आणि रिंकीची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळाली.

He doesn't talk to me much because...; Sachivji and Rinki in 'Panchayat' have a different bonding | तो माझ्याशी जास्त बोलतच नाही, कारण...; 'पंचायत'मधील सचिवजी आणि रिंकीचं वेगळंच बॉण्डिंग

तो माझ्याशी जास्त बोलतच नाही, कारण...; 'पंचायत'मधील सचिवजी आणि रिंकीचं वेगळंच बॉण्डिंग

अलिकडेच 'पंचायत ३' (Panchayat Web Series) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजच्या तिसऱ्या सीझनलाही चांगला प्रतिसाद मिळाला. या सीरिजमध्ये सचिवजीची भूमिका अभिनेता जितेंद्र कुमार(Jitendra Kumar)ने आणि रिंकीची भूमिका संविका(Sanvika)ने साकारली आहे. तिन्ही सीरिजमध्ये सचिवजी आणि रिंकीची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळाली. दोघेही प्रेक्षकांचे सर्वात आवडते ऑन-स्क्रीन जोडपे बनले. 'पंचायत' या सीरिजमध्ये सचिवजी आणि रिंकी यांचा रोमान्स हळूहळू सुरू होताना दिसत आहे. दरम्यान, अभिनेत्री संविकाने जितेंद्र कुमारसोबतच्या तिच्या रिअल लाइफ बॉण्डिंगबद्दल खुलासा केला आहे.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीदरम्यान संविकाला या मालिकेतील तिचा आवडता सहकलाकार कोण आहे, असे विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने सांगितले की, तिचे सर्वांशी चांगले नाते आहे आणि प्रत्येकजण खूप गोड आहे, पण जितेंद्र कुमारसोबत जास्त सीन्स असल्यामुळे मी त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकले आहे. 

आम्ही एकमेकांशी फारसे बोलत नाहीत कारण...

ती पुढे म्हणाली की आम्ही एकमेकांशी फारसे बोलत नाहीत कारण जितेंद्र खूप लाजाळू आहे आणि काहीही बोलायलाही तो संकोच करतो. संविका म्हणाली, 'आम्ही आमचे सीन्स आणि संवाद एकत्र प्रॅक्टिस करायचो आणि मग जाऊन परफॉर्म करायचो. सीझन ३ मध्ये दोघांमधील संभाषण चांगले सुरू झाले आहे परंतु तरीही जितेंद्र मी जे बोलते त्याला उत्तर देतो. पहिल्या दोन सीझनमध्ये कामासाठी रिझवर्ड होता. ती म्हणाली की, 'पंचायत' नंतर तिला नवीन ऑफर्स मिळू लागल्या आहेत, पण कास्टिंग डायरेक्टरने तिला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका द्याव्यात अशी तिची इच्छा आहे.

'पंचायत'बद्दल
फुलेरा नावाच्या छोट्या गावातील पंचायतीवर आधारित ही सीरिज आहे. कॉमेडी-ड्रामा सीरिज 'पंचायत'ची कथा अभिषेक त्रिपाठी याच्याभोवती फिरते जो सचिव आहे. दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित या मालिकेत नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैजल मलिक आणि दुर्गेश कुमार यांसारखे अनेक दिग्गज कलाकार दिसले आहेत. 'पंचायत ३' नंतर आणखी दोन सीझन येणार आहेत.

Web Title: He doesn't talk to me much because...; Sachivji and Rinki in 'Panchayat' have a different bonding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.