'डॉ. अरोरा'चा ट्रेलर प्रदर्शित; गुप्तरोगावर आधारित इम्तियाज अलीची पहिली Web Series
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 14:30 IST2022-07-06T14:30:00+5:302022-07-06T14:30:00+5:30
Imtiaz ali new web series: मासिक पाळीपासून ते लैंगिक शिक्षणासारखे नाजूकविषयीदेखील अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी हाताळले आहेत. यामध्येच आता गुप्तरोगावर भाष्य करणारी एक वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'डॉ. अरोरा'चा ट्रेलर प्रदर्शित; गुप्तरोगावर आधारित इम्तियाज अलीची पहिली Web Series
सध्याच्या काळात समाजात घडणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या विषयांवर आधारित चित्रपट, मालिका आणि वेबसीरिजची निर्मिती होताना दिसत आहे. यात अनेक वेबसीरिजच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मासिक पाळीपासून ते लैंगिक शिक्षणासारखे नाजूकविषयीदेखील अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी हाताळले आहेत. यामध्येच आता गुप्तरोगावर भाष्य करणारी एक वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक असलेले इम्तियाज अली (Imtiaz ali) कायम वेगवेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न करत असतात. या विषयांमधून समाजप्रबोधन होईल याकडे त्यांचा सर्वाधिक कल असतो. त्यामुळेच त्यांची गुप्तरोगावर
आधारित 'डॉ. अरोरा- गुप्त रोग विशेषज्ञ'। ही नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरमध्ये वैवाहिक जीवनातील काही अडचणींवर भाष्य करण्यात आलं आहे.
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये सेक्शुअल विषय अत्यंत हलक्याफुलक्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे. अनेकदा गुप्तरोगावर भाष्य करताना लोक लाजतात. परंतु, या समस्येचं योग्य निदान केलं नाही तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो हे यातून सांगायचा प्रयत्न केला आहे.
Dr. Arora-Gupt Rog Visheshagya या सीरिजमध्ये अभिनेता कुमुद मिश्रा (Kumud Mishra) यांनी सेक्सोलॉजिस्टची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासह या सीरिजमध्ये विवेक मुश्रान, विद्या मालवडे, संदीपा धर आणि शेखर सुमन यांसारखे कलाकार झळकले आहेत. दरम्यान, साजिद अली आणि अर्चित कुमार दिग्दर्शित ही सीरिज २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.