रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स'ची रिलीज डेट जाहिर, पोस्टर शेअर करत शिल्पा शेट्टी म्हणाली..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 03:59 PM2023-10-21T15:59:54+5:302023-10-21T16:07:07+5:30

शिल्पा लवकरच रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Indian police force release date announced shilpa shetty vivek oberoi sidharth malhotra share the poster of rohit shetty cop universe | रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स'ची रिलीज डेट जाहिर, पोस्टर शेअर करत शिल्पा शेट्टी म्हणाली..

रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स'ची रिलीज डेट जाहिर, पोस्टर शेअर करत शिल्पा शेट्टी म्हणाली..

शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हे नाव  आज कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. आजवरच्या कारकिर्दीमध्ये शिल्पाने अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. शिल्पा लवकरच रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी  सज्ज झाली आहे. इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजची रिलीज डेट समोर आली आहे. 

शिल्पा शेट्टीने पहिले यातील आपला लूकदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिल्पासह यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि
 विवेक ओबेरॉय डॅशिंग लूकमध्ये दिसतायेत. हे पोस्टर शेअर करताना शिल्पाने लिहिले, सायरन वाजला की समजा गुन्हेगारीची बँड वाजणार. यात शिल्पा महिला पोलिसाच्या भूमिकेत 

सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि विवेक ओबेरॉय हे तीन प्रमुख कलाकार पोलिस दलाच्या लूकमध्ये बंदुका हातात घेतलेले दिसतात.रोहित शेट्टी दिग्दर्शित ही वेबसिरीज  पुढील वर्षी 19 जानेवारी रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.. शिल्पा व्यतिरिक्त  रोहित शेट्टीने देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे पोस्टर शेअर केले आहे. चाहते रोहित शेट्टीच्या या अॅक्शन वेबसिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान शिल्पाने आता फारसे सिनेमे न करण्याचं ठरवलं आहे. यामागचं कारणही सांगितलं आहे. अलिकडेच शिल्पा शेट्टी म्हणाली,'मला आता जास्त काम करायचं नाही. मी आता फक्त माझ्या दोन्ही मुलांकडे पूर्ण लक्ष देणार आहे. त्यांना वेळ देणार आहे. कारण दोघंही मोठे होत आहेत. आता मी तेच प्रोजेक्ट घेईन जे वेळ देण्यालायक असतील. हा मी यावर्षी विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. तुम्ही मला कमी सिनेमांमध्ये बघाल यात शंका नाही पण जे चित्रपट करेन ते शानदार करेन.'

Web Title: Indian police force release date announced shilpa shetty vivek oberoi sidharth malhotra share the poster of rohit shetty cop universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.