पुण्यात घडलेल्या १९७० च्या दशकातील भीषण हत्याकांडावर आधारित 'जक्कल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 04:50 PM2022-09-02T16:50:45+5:302022-09-02T17:04:25+5:30

१९७० च्या दशकात पुण्यात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडावर आधारित 'जक्कल' नावाची मराठी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jakkal new marathi web series is based on the gruesome massacre that took place in Pune in the 1970s | पुण्यात घडलेल्या १९७० च्या दशकातील भीषण हत्याकांडावर आधारित 'जक्कल!

पुण्यात घडलेल्या १९७० च्या दशकातील भीषण हत्याकांडावर आधारित 'जक्कल!

googlenewsNext

लवकरच 'जक्कल' नावाची मराठी वेबसीरिज घेऊन येत आहेत. १९७० च्या दशकात पुण्यात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडावर आधारित हा वेब शोअसून सामान्य मध्यमवर्गातील मुलं कळत नकळतपणे जेव्हा गन्हेगारीच्या मार्गावर वळतात आणि ते कोणत्या टोकाला जाऊ शकतात याचा शोध घेणारी ही मालिका असणार आहे. 

दिग्दर्शक विवेक वाघ यांची ही संकल्पना असून ते गेले ४ वर्षांपासून या विषयावर काम करत आहेत. विवेक वाघ यांना २०२० मध्ये याच विषयावर आधारित 'बेस्ट इन्वेस्टिगेटिव्ह डॉक्युमेंट्री' (Best Investigative Documentary) हा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या मालिकेची निर्मिती ए कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रोडक्शनचे शिवम यादव आणि कार्तिकी यादव यांनी केली आहे.

या निमित्ताने बोलताना दिग्दर्शक विवेक वाघ म्हणाले “1976 ते 1977 ह्या काळात पुण्यासारख्या पेन्शनर आणि सांस्कृतिक शहरात दोन आणीबाणी लागू झाल्या एक दिल्लीची आणि दुसरी जक्कलची. 

आणि म्हणूनच खळबळ जनक हत्याकांड, क्रूर हत्या ह्या पलीकडे काय आहे जक्कल? जक्कल हे आडनाव आहे का ही वृत्ती ? आणि या मध्ये अडकलेल्या त्या १० निरपराध लोकांचं काय?

महत्वाचं म्हणजे एक कलाकार खुनी होता का एक खुनी दुर्देवीने कलाकार होता, ह्याचा धांडोळा जक्कल या मालिकेत करण्याचा प्रयत्न असणारं आहे.” 

Web Title: Jakkal new marathi web series is based on the gruesome massacre that took place in Pune in the 1970s

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.