अर्जुन रेड्डीला भेटला कबीर सिंह, शाहीदने सर्वांसमोर विजयला केलं kiss; स्टेजवर नुसती धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 18:57 IST2024-03-20T18:56:28+5:302024-03-20T18:57:12+5:30
पडद्यावरील कबीर सिंह आणि अर्जुन रेड्डी स्टेजवर एकत्र येतात तेव्हा....

अर्जुन रेड्डीला भेटला कबीर सिंह, शाहीदने सर्वांसमोर विजयला केलं kiss; स्टेजवर नुसती धमाल
अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) या ओटीटी प्लॅटफॉर्मने काल तब्बल ७० प्रोजेक्ट्सची घोषणा केली. येत्या काही दिवसात सर्व प्रोजेक्ट्स रिलीज होणार आहे. यामध्ये चित्रपट आणि वेबसीरिजचा समावेश आहे. 'मिर्झापूर', 'पंचायत', 'बंदिश बँडिट्स', 'पाताल लोक' सारख्या वेबसीरिजचे सीक्वेल ते 'स्त्री 2', 'सिटाडेल', 'अश्वत्थामा' सह अनेक सिनेमांचा समावेश आहे. काल अॅमेझॉनच्या भव्य इव्हेंटसाठी कलाकार मंडळींची रेलचेल होती. तेव्हा पडद्यावरील कबीर सिंह (Kabir Singh)आणि अर्जुन रेड्डी (Arjun Reddy) स्टेजवर एकत्र आले. तेव्हा काय धमाल आली बघा.
अॅमेझॉन प्राईमने १९ मार्चला #AreYouReady इव्हेंटचं आयोजन केलं होतं. यावेळी शाहीद कपूर (Shahid Kapoor)आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) एकमेकांना भेटले. तेव्हा शाहीद विजयला बघून भलताच खूश झाला. आधी त्याने विजयला किस केले आणि म्हणाला,"जर विजय देवरकोंडा नसता तर अर्जुन रेड्डी नसता, आणि अर्जुन रेड्डी नसता तर कबीर सिंह नसता. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला खूप आवडतोस." त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तसंच मागे अभिनेत्री मृणाल ठाकूरही उभी आहे.
'अर्जुन रेड्डी' हा संदीप रेड्डी वांगाचा पहिला दिग्दर्शित सिनेमा आहे. यामध्ये विजय देवरकोंडाने मुख्य भूमिका साकारली. नंतर 2019 मध्ये हिंदी रिमेक 'कबीर सिंह' बनवला ज्यात शाहीदला घेतले. त्यामुळे अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंह एकाच स्टेजवर आल्याने सर्वांनाच मजा आली.
या इव्हेंटमध्ये 'अश्वत्थामा' सिनेमाची घोषणा झाली. यात शाहीद कपूर मुख्य भूमिकेत असल्याचं जाहीर झालं. तर विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरचा 'फॅमिली स्टार' सिनेमाही रिलीज होणार आहे.