करण जोहरची Love Storiyaan सीरिज झाली Banned! ट्रान्सजेंडर कपलच्या लव्ह स्टोरीमुळे वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 13:14 IST2024-02-19T13:13:43+5:302024-02-19T13:14:27+5:30
'लव्ह स्टोरीया' वेब सीरिजमध्ये एका ट्रान्सजेंडर कपलची लव्ह स्टोरीही दाखविण्यात आली आहे. पण, यामुळे करण जोहरची सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

करण जोहरची Love Storiyaan सीरिज झाली Banned! ट्रान्सजेंडर कपलच्या लव्ह स्टोरीमुळे वाद
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरची 'लव्ह स्टोरीया' ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने करणने १४ फेब्रुवारीला 'लव्ह स्टोरीया' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली. या सीरिजमधून खऱ्या आयुष्यात घडलेल्या सहा अनोखी प्रेमकथा मांडण्यात आल्या आहेत. पण, करण जोहरच्या या सीरिजमधील एका वेब सीरिजमुळे वाद निर्माण झाला आहे.
'लव्ह स्टोरीया' वेब सीरिजमध्ये एका ट्रान्सजेंडर कपलची लव्ह स्टोरीही दाखविण्यात आली आहे. पण, यामुळे करण जोहरची सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 'लव्ह स्टोरीया'मध्ये सहावी प्रेमकथा कोलकत्त्यामधील तिस्ता आणि दीपन या ट्रान्सजेंडर कपलची आहे. या कपलच्या लिंग परिवर्तनाच्या कथेमुळे सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यामुळे काही देशांमध्ये या एपिसोडवर बंदी घालण्यात आली आहे. युएई, दक्षिण अरब, इंडोनेशिया, मिस्र या देशांमध्ये लव्ह स्टोरीयाचा सहावा एपिसोड बॅन करण्यात आला आहे.
'लव्ह स्टोरीया' या वेब सीरिजमधील प्रेमकथा या अक्षय इंडीकर, अर्चना फडके, कॉलिन डी कुन्हा, हार्दिक मेहता, शाजिया इकबाल आणि विवेक सोनी या दिग्दर्शित केल्या आहेत. प्रिया रमानी, समर हलारनकर आणि निलोफर वेंकटरमन यांच्या इंडिया लव्ह प्रोजेक्टमधील कथांवर ही सीरिज आधारित आहे. अॅमेझॉन प्राइमवर ही सीरिज प्रदर्शित करण्यात आली आहे.