कुशल बद्रिकेला गाडीत मारहाण; अभिनेत्याने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:22 IST2022-08-02T14:22:04+5:302022-08-02T14:22:37+5:30

kushal badrike: सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे मित्र त्याला मारताना दिसत आहेत. 

kushal badrike funny video struggler sala season 3 | कुशल बद्रिकेला गाडीत मारहाण; अभिनेत्याने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

कुशल बद्रिकेला गाडीत मारहाण; अभिनेत्याने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा अभिनेता, विनोदवीर म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). कुशल सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तो त्याच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे मित्र त्याला मारताना दिसत आहेत. 

कुशलने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये   संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, दिग्दर्शक विजू माने हे कुशलला मारहाण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कुशलच्या एका चुकीमुळे ही कलाकार मंडळी त्याला कारमध्ये बसूनच मारतात. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेत येत आहे.
कुशलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्येल तो त्याच्या मित्रमंडळींसोबत एका स्क्रिप्टचं वाचन करत आहे. मात्र, ही स्क्रिप्ट वाचत असताना तो मध्येच काहीतरी भलती बडबड करतो त्यामुळे सगळे मित्र त्याला मारतात. परंतु, यात हे कलाकार खरोखर कुशलला मारत नसून ते मस्करीमध्ये मारत आहेत. मात्र, या व्हिडीओमधून त्यांच्यातील मैत्री दिसून येते.

हा व्हिडीओ शेअर करत 'मला तर काय कळलंच नाही, यांनी मला का मारलं ते', असं कुशलने म्हटलं आहे.
दरम्यान, कुशलचा व्हिडीओ कॉमेडी असला तरी हे त्यांच्या नवीन कामाचं प्रमोशन आहे.  विजू माने दिग्दर्शित 'स्ट्रगलर साला सीझन 3' प्रेक्षकाच्या भेटीला येत आहे.  स्ट्रगलर साला ही मराठी कॉमेडी वेब सीरिज आहे. 
 

Web Title: kushal badrike funny video struggler sala season 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.