"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 05:37 PM2024-11-25T17:37:38+5:302024-11-25T17:38:45+5:30

मनीषा कोईरालाने जेव्हा पदार्पण केलं होतं तेव्हा...

manisha koirala reveals many questions asked on her debut in film industry | "चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

'बॉम्बे', 'दिल से' असे अनेक हिट देणारी ९० च्या दशकातील अभिनेत्री मनिषा कोईराला (Manisha Koirala). कॅन्सरवर मात केल्यानंतर मनिषाने हिंदी सिनेसृष्टीत कमबॅक केले. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनेक वादळांमुळे ती स्क्रीनवरुन गायब झाली होती. मात्र यावर्षी आलेल्या 'हीरामंडी' सीरिजमधून तिने आपली जादू पुन्हा दाखवली. मनिषा कोईरालाने जेव्हा पदार्पण केलं होतं तेव्हा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते असा खुलासा नुकतंच तिने केला.

फिल्ममेकर विक्रमादित्य मोटवानी आयोजित आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये मनिषा कोईरालाही सहभागी झाली होती. यावेळी ती म्हणाली, "जेव्हा मी सुमारे ३० वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री केली तेव्हाचा काळ खूप वेगळा होता. तेव्हा येलो जर्नलिझम मोठ्या स्केलवर होतं. प्रत्येकाने माझ्या अभिनय करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला होता. चांगल्या घरातल्या मुली अभिनय क्षेत्रात येत नाही असा तेव्हा सगळ्यांचा समज होता. मात्र माझा पहिलाच सिनेमा हिट झाला मी माझा प्रवास असाच सुरु ठेवला. त्यामुळे जे माझ्यावर टीका करत होते त्यांनाच माझा अभिमान वाटायला लागला."

ती पुढे म्हणाली, "एक वेब सीरिज करतानाही मी याच प्रश्नांना सामोरी गेले होते. जेव्हा मला हीरामंडीसाठी विचारणा झाली तेव्हा मला ओटीटीवर पदार्पण करण्यात काहीच शंका नव्हती. मला सुरुवातीपासूनच सीरिजवर विश्वास होता. सीरिज संजय भन्साळींची आहे म्हणूनच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म आता गेमचेंजर बनत चालला आहे यामुळे होकार दिला."

मनिषा कोईराला आता 'हीरामंडी 2'मध्ये दिसणार आहे. अद्याप सीरिजचं शूट सुरु झालेलं नाही मात्र सीक्वेलची घोषणा झाली आहे. 

Web Title: manisha koirala reveals many questions asked on her debut in film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.