The Family Man 3: “स्वागत नहीं करोगे हमारा...” म्हणत मनोज वाजपेयीनं 'द फॅमिली मॅन 3'बद्दल दिली मोठी हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 15:32 IST2023-02-08T15:10:01+5:302023-02-08T15:32:20+5:30
The Family Man 3, Manoj Bajpayee : तुम्हीही 'द फॅमिली मॅन 3'ची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

The Family Man 3: “स्वागत नहीं करोगे हमारा...” म्हणत मनोज वाजपेयीनं 'द फॅमिली मॅन 3'बद्दल दिली मोठी हिंट
'द फॅमिली मॅन'चा (The Family Man) पहिला सीझन तुफान गाजला. इतका की, या सीरिजचा दुसरा सीझन कधी एकदा येतो, असं चाहत्यांना झालं होतं. अखेर दुसरा सीझनही आला. हा सीझनही लोकांनी डोक्यावर घेतला. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची अर्थात 'द फॅमिली मॅन 3'ची. तुम्हीही 'द फॅमिली मॅन 3'ची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, 'द फॅमिली मॅन 3'ची रिलीज डेट आली आहे.
अभिनेते मनोज वाजपेयीने(Manoj Bajpayee) एक व्हिडीओ शेअर करुन फॅमिली मॅन-3 (The Family Man 3)च्या रिलीजची हिंट दिली आहे. या व्हिडीओला मनोज वाजपेयीने दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
मनोज वाजपेयीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.'फॅमिली के साथ आ रहा हूँ, स्वागत नहीं करोगे हमारा' असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओमध्ये मनोज वाजपेयी म्हणतो, 'तुम्ही सगळे कसे आहात? आता लक्षपूर्वक ऐका, या होळीला माझ्या फॅमिलीला घेऊन मी तुमच्या फॅमिलीला भेटायला येत आहे...' मनोज वाजपेयीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते क्रेझी झाले आहेत. या होळीला फॅमिली मॅन-3 रिलीज होणार आहे, असा अंदाज प्रेक्षक लावत आहेत.
मनोज वायपेयीनं 'द फॅमिली मॅन'च्या दोन्ही सीझनमध्ये श्रीकांत तिवारी ही भूमिका साकारली. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली. 'द फॅमिली मॅन'च्या दोन्ही सीझनमध्ये मनोज वायपेयी, शारीब हाश्मी, प्रियामणी, श्रेया धन्वंतरी आणि शरद केळकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तर दुसऱ्या सीझनमध्ये सामंथा रुथ प्रभूनं प्रमुख भूमिका साकारली होती. साहजिकच तिसऱ्या सीझनमध्ये कोणते नवे चेहेरे दिसणार, याबद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.