'मिर्झापूर 3' काहीच तासांमध्ये होणार रिलीज! नेमकी वेळ काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 11:44 AM2024-07-04T11:44:34+5:302024-07-04T11:47:15+5:30

'मिर्झापूर 3' ची उत्सुकता शिगेला आहे. अवघ्या काहीच तासांमध्ये वेबसीरिज रिलीज होणार आहे. जाणून घ्या वेळ

Mirzapur 3 release time story cast plot know details inside | 'मिर्झापूर 3' काहीच तासांमध्ये होणार रिलीज! नेमकी वेळ काय? जाणून घ्या

'मिर्झापूर 3' काहीच तासांमध्ये होणार रिलीज! नेमकी वेळ काय? जाणून घ्या

'मिर्झापूर 3' ची उत्सुकता शिगेला आहे. आधीच्या दोन सुपरहिट सीझनप्रमाणे 'मिर्झापूर 3' सुद्धा हिट होईल यात काही शंका नाही. 'मिर्झापूर 3' ही गेल्या अनेक वर्षातील बहुचर्चित वेबसीरिज म्हणून ओळखली जातेय. 'मिर्झापूर 3'मध्ये पुन्हा एकदा मिर्झापूरवर राज्य करण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत. अशातच ही वेबसीरिज उद्या म्हणजेच ५ जुलैला रिलीज होणार आहे. पाहा वेबसीरिज रिलीजची नेमकी वेळ काय?

'मिर्झापूर 3' या वेळी होणार रिलीज

प्राईम व्हिडीओच्या आधीच्या सर्व वेबसीरिजच्या रिलीज डेटकडे नजर गेल्यास तुमच्या लक्षात येईल की, प्राईम व्हिडीओवर कोणतीही नवीन वेबसीरिज ही रात्री बरोबर १२ च्या ठोक्याला रिलीज केली जाते. याचाच अर्थ 'मिर्झापूर 3' सुद्धा ५ जुलै सुरु होताच बरोबर रात्री १२ वाजता प्राईम व्हिडीओवर रिलीज होईल. ही बातमी वाचताच अनेकजण आज रात्री 'मिर्झापूर 3' संपूर्ण पाहण्यासाठी जागायची तयारी ठेवतील यात शंका नाही.

'मिर्झापूर' च्या आधीच्या सीझनमध्ये काय घडलं?

'मिर्झापूर'च्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेता दिव्येंदू शर्माने साकारलेल्या मुन्ना त्रिपाठीचा मृत्यू होतो. गुड्डू (अली फजल) आणि गोलू (श्वेता त्रिपाठी शर्मा) यांनी कालिन भैय्याला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु कालिन भैय्याने पळून आपला जीव वाचवला. कालीन भैय्याची पत्नी रसिका डुग्गल आणि जवळचा सहकारी मकबूल यांनी कालिन भैय्याचे वडील बाऊजींची हत्या केली. ही व्यक्तिरेखा कुलभूषण खरबंदा यांनी साकारली होती. यासोबतच गोळीबारात दद्दा त्यागी (लिलिपुट), भरत (विजय वर्मा), शत्रुघ्न (विजय वर्मा) आणि मामा (श्रीकांत वर्मा) यापैकी भरत आणि मामा यांचा मृत्यू झाला. 

Web Title: Mirzapur 3 release time story cast plot know details inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.