फक्त नाव आहे 'मिर्झापूर', शूटिंगचे खरे लोकेशन तर आहेत भलतेच; सिरीजमागची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 11:11 AM2023-11-09T11:11:26+5:302023-11-09T11:15:24+5:30
सीरिजचं नाव भलेही मिर्झापूर असेल पण याचं शूट लोकेशन वेगळंच आहे.
ओटीटीवरील सुपरहिट वेबसिरीज 'मिर्झापूर'च्या सिझन 3 (Mirzapur 3)ची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. यावर्षी सिझन ३ रिलीज होण्याची शक्यता आहे.नुकतंच पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सोशल मीडियावर लाईव्ह आले मात्र त्यांना नक्की काय बोलायचं होतं हेच ते विसरुन गेले. मिर्झापूरच्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही सिझनने धुमाकूळ घातला.पण तुम्हाला माहितीये का सिरीजचं चित्रीकरण मिर्झापूर शहरात झालेलंच नाही.
सीरिजचं नाव भलेही मिर्झापूर असेल पण याचं शूट लोकेशन वेगळंच आहे. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधील क्राईम, पॉलिटिक्स यावर सिरीज आधारित आहे. गोष्ट काल्पनिक असली तरी मिर्झापूरमध्ये अशाच पद्धतीने क्राईम होतात हेही खरं आहे. पण मेकर्सच्या म्हणण्यानुसार ही कहाणी खऱ्या मिर्झापूर शहराची नाहीच आहे. मिर्झापूरला फक्त ध्यानात ठेवून ही काल्पनिक कथा दाखवण्यात आली आहे. म्हणूनच याचं शूट मिर्झापूरमध्ये कधीच झालं नाही.
27 सप्टेंबर 2017 मध्ये सिरीजचं शूटिंग उत्तरप्रदेशच्या वाराणसी शहरात सुरु झालं. यासोबतच जौनपुर,आजमगढ, गाजीपुर, लखनऊ,रायबरेली, गोरखपूरमध्ये सिरीजचे अनेक सिक्वेन्स शूट केले गेले आहेत. गंगा नदीच्या घाटावरही अनेक सीन्स शूट केले गेले आहेत. मिर्झापूर 2 चं बरंच चित्रीकरण हे लखनऊमध्ये झालं. तर तिसऱ्या भागाचा सेटही लखनऊमध्येच बनवला गेला.