'मिर्झापूर' फेम अभिनेत्याने स्वतःला दिलेला शब्द मोडला, अनेक वर्षांनी दाढी करुन बदलला लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 11:20 AM2024-08-23T11:20:26+5:302024-08-23T11:27:57+5:30

'मिर्झापूर' वेबसीरिज चांगलीच गाजली. या वेबसीरिजमधील अभिनेत्याने खूप वर्षांनी दाढी करुन त्याचा चेहरामोहरा बदलून टाकलाय

Mirzapur webseries actor anil george doing his shave for kalki 2898 ad movie | 'मिर्झापूर' फेम अभिनेत्याने स्वतःला दिलेला शब्द मोडला, अनेक वर्षांनी दाढी करुन बदलला लूक

'मिर्झापूर' फेम अभिनेत्याने स्वतःला दिलेला शब्द मोडला, अनेक वर्षांनी दाढी करुन बदलला लूक

'मिर्झापूर' वेबसीरिजचे अनेक चाहते आहेत. वेबसीरिजचं कथानक, कलाकारांचा अभिनय, डायलॉग आणि गाणी अशा सर्व गोष्टींची चांगलीच चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी आलेल्या 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 'मिर्झापूर'मधील प्रत्येक व्यक्तिरेखेची चांगलीच चर्चा झाली. 'मिर्झापूर'मधील अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे लाला. "बडे ह**  हो बेटा!" हा लालाचा डायलॉग चांगलाच गाजला. 'मिर्झापूर'मधील लालाची भूमिका साकारली अभिनेते अनिल जॉर्ज यांनी. अनिल यांनी इतक्या वर्षांपासून स्वतःला दिलेला शब्द तोडला असून त्यांचा लूक बदललाय.

अनिल यांनी दाढी करुन बदलला लूक

अनिल यांनी 'कल्कि २८९८ एडी' सिनेमासाठी त्यांचा हा लूक बदलला. एका मुलाखतीत ते म्हणाले, "दाढी वाढवल्यानंतर मला आतंकवाद्यांची भूमिका करण्याच्या ऑफर्स येऊ लागल्या. मी ठरवलं होतं की जोवर कोणती मोठी भूमिका वाट्याला येत नाही तोवर दाढी करणार नाही. पण म्हणतात ना परमेश्ववर तुमच्या स्वप्नांना जादुईरित्या पूर्ण करतो. मला 'कल्कि २८९८ एडी' ची ऑफर आली. त्यामुळे मी स्वतःला दिलेला शब्द मोडून कल्किमधील भूमिकेसाठी दाढी करण्याचा निर्णय घेतला."

अनिल यांची 'मिर्झापूर'मधील भूमिका गाजली

अशाप्रकारे अनिल यांनी 'कल्कि २८९८ एडी' सिनेमासाठी दाढी केल्याचा खुलासा केला. अनिल हे कमल हासन यांचे मोठे चाहते आहेत. 'कल्कि २८९८ एडी' सिनेमात त्यांना कमल हासनसोबत काम करण्याची संधी मिळाली. आपल्या आवडत्या कलाकारासोबत काम करण्यासाठी अनिल जॉर्ज खूपच उत्सुक होती. पण ही एक्सायमेंट त्यांनी अभिनय करताना लपवून ठेवली. अनिल यांनी 'मिर्झापूर ३' मध्येही लालाची भूमिका साकारली. पण याच सीझनमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखाचा अंत होताना दिसतो.

Web Title: Mirzapur webseries actor anil george doing his shave for kalki 2898 ad movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.