"बे एके बे, बे दुणे.." नीना गुप्तांनी 'पंचायत 3' च्या सेटवरुन शेअर केलेला व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 12:47 PM2024-06-02T12:47:33+5:302024-06-02T12:48:18+5:30

शूटींगनंतर नीना गुप्ता - रघुवीर यादव यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. दोघांचाही मस्तीखोर अंदाज पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल (panchayat 3)

Neena Gupta raghuvir yadav video viral from the sets of Panchayat 3 will | "बे एके बे, बे दुणे.." नीना गुप्तांनी 'पंचायत 3' च्या सेटवरुन शेअर केलेला व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

"बे एके बे, बे दुणे.." नीना गुप्तांनी 'पंचायत 3' च्या सेटवरुन शेअर केलेला व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

'पंचायत 3' ची सध्या चांगलीच चर्चा आहे. यंदाची पंचायत थोडी इमोशनल असून प्रेक्षकांच्या काळजाला हात घालतेय. पुन्हा एकदा फुलेरा गावातील कहाणी प्रेक्षकांना भिडतेय. 'पंचायत 3' मधील सर्वच व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. या सीरिजमधील अशीच आवडणारी दोन कॅरेक्टर म्हणजे प्रधानजी आणि  प्रधानपती. या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री आपण सर्वांनी पाहिलीच. आता प्रधान-प्रधानपती अर्थात नीना गुप्ता-रघुवीर यादव ऑफ स्क्रीन किती धमाल करतात याचा एक मजेदार व्हिडीओ समोर आलाय. 

प्रधानजी आणि प्रधानपतीची ऑफस्क्रिन धमाल'

पंचायत 3' मधील प्रधानजी आणि प्रधानपती  अर्थात नीना गुप्ता आणि रघुवीर  यादव हे दोघेही कसलेले कलाकार. गेली अनेक वर्ष दोघे बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. 'पंचायत' निमित्ताने दोघेही नवरा - बायकोची भूमिका साकारत आहेत. ऑनस्क्रिन दोघांचीही कमाल केमिस्ट्री बघायला मिळालीच. पण ऑफस्किन सुद्धा नीना आणि रघुवीर यांच्यात किती घट्ट मैत्री आहे हे पाहायला मिळतंय. दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत पंचायत ऑफिसबाहेर दोनाचा पाढा वापरत जो समाज प्रबोधनाचा संदेश देण्यात आलाय, तो संदेश दोघेही मस्तीखोर अंदाजात वाचत आहेत. हा व्हीडीओ पाहून तुम्हाला खळखळून  हसायला येईल यात शंका नाही.

'पंचायत 3' विषयी

'पंचायत 3' बद्दल सांगायचं तर.. नीना गुप्तांनी वेबसिरीजमध्ये मंजूदेवीची भूमिका साकारली आहे. सिरीजमध्ये नीना गुप्ता आणि रघुवीर यादव या नवराबायकोची केमिस्ट्री चांगलीच गाजली. 'पंचायत 3'मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, सान्विका, फैसल मलिक, चंदन रॉय हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. आधीच्या दोन भागांच्या घवघवीत यशानंतर 'पंचायत 3' पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे. लोकांना तिसरा सीझनही आवडल्याचं दिसतंय

Web Title: Neena Gupta raghuvir yadav video viral from the sets of Panchayat 3 will

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.