"पैशांनी प्रेमही विकत घेता येतं...", नीना गुप्तांंचं रोखठोक मत; सर्वांना दिला खास उपदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 02:54 PM2024-11-17T14:54:37+5:302024-11-17T14:59:52+5:30

नीना गुप्तांच्या वक्तव्याने पुन्हा वेधलं लक्ष

neena gupta says money can buy everything even it can buy love appeared at kareena kapoor show what women want | "पैशांनी प्रेमही विकत घेता येतं...", नीना गुप्तांंचं रोखठोक मत; सर्वांना दिला खास उपदेश

"पैशांनी प्रेमही विकत घेता येतं...", नीना गुप्तांंचं रोखठोक मत; सर्वांना दिला खास उपदेश

अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) हिंदी सिनेसृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्या सध्या ६५ वर्षांच्या आहेत. त्यांचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेचा विषय होतं. सुरुवातीच्या काळात अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर त्यांचं वेस्ट इंडीजचा क्रिकेटर विवयन रिचर्ड्स सोबत अफेअर सुरु झालं. यातून त्या गरोदर राहिल्या. त्यांच्या प्रेग्नंसीची त्या काळी खूप चर्चा झाली होती. याही परिस्थितीत त्यांनी मुलीला जन्म दिला. एकटीनेच मुलीचा सांभाळ केला. काही वर्षांपूर्वी त्यांच्या करिअरने अचानक झेप घेतली. त्यांचे सिनेमे, सीरिज तुफान गाजल्या. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी आयुष्याच पैशाचं किती महत्व आहे हे सांगितलं.

करिना कपूरच्या 'व्हॉट वूमन वॉन्ट'शोमध्ये नीना गुप्ता यांनी हजेरी लावली. यावेळी त्या म्हणाल्या, "मी नेहमीच पैशांबाबतीत घेऊन सावधान राहिले आहे. आपल्याला लहानपणापासून हे शिकवलं असतं की पैशांनी तुम्ही सगळं विकत घेऊन शकत नाही. पण मी असं शिकले आहे की पैशांनी तुम्ही सगळं विकत घेऊ शकता. अगदी प्रेमही. त्यामुळे मुलांना चुकीच्या गोष्टी शिकवू नका."

त्या पुढे म्हणाल्या, "मी स्वतंत्र आहे आणि स्वत: कमावते. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझा नवरा खूप चांगला आहे आणि माझ्यासाठी सगळं काही करतो. मला त्याच्यावर शंका नाहीच. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तरी सुद्धा मला वाटतं की माझा पैसा माझ्या बँकेत असावा. मला स्वत:ला याबाबतीत सुरक्षित करायचं आहे. नवरा म्हणतो की पैसे तुझेच आहेत तुला एफडी करण्याची गरज नाही. तो सीए आहे आणि त्याला एफडी ही गोष्ट वेडेपणा वाटतो. कारण त्यातून तुम्हाला रिटर्न्स मिळत नाही. पण मी त्यांना सांगते की मला एफडीमुळे मानसिक शांती मिळते."

नीना गुप्ता यांच्या या उत्तरावर करिनाही सहमती दर्शवत म्हणाली, "मी हेच सैफ, करिष्मा आणि माझ्या मुलांना सांगू इच्छिते."

नीना गुप्ता यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी नवी दिल्ली स्थित सीए विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या '1000 बेबीज' या सीरिजमध्ये नीना गुप्ता झळकल्या. शिवाय त्यांनी 'पंचायत' या गाजलेल्या सीरिजच्या पुढच्या भागाला सुरुवात केली आहे.

Web Title: neena gupta says money can buy everything even it can buy love appeared at kareena kapoor show what women want

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.